Monday, September 28, 2026
HomeनगरCrime News : पतीच्या निधनानंतर महिलेला घराबाहेर काढले, उच्चशिक्षित महिलेलाही मारहाण

Crime News : पतीच्या निधनानंतर महिलेला घराबाहेर काढले, उच्चशिक्षित महिलेलाही मारहाण

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

हुंड्याच्या मागणीसाठी विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना अहिल्यानगरमध्ये उघडकीस आल्या असून दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. एका प्रकरणात पतीच्या निधनानंतर २९ वर्षीय महिलेला सासरच्यांनी घराबाहेर काढल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या प्रकरणात एम.टेक पदवीधारक ३३ वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्यांकडून छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

पहिल्या प्रकरणात पोलीस मुख्यालयात राहणाऱ्या २९ वर्षीय पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सासू अल्का घुगे, सासरे विजय घुगे व दीर गणेश घुगे (सर्व रा. नाशिक) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचा विवाह २०२१ मध्ये किशोर घुगे यांच्यासोबत झाला होता. लग्नावेळी माहेरकडून २५ तोळे सोने व रोख रक्कम देण्यात आली होती. मात्र, नाशिक येथे शेतजमीन खरेदीसाठी माहेरून ५० लाख रूपये आणावेत, अशी मागणी सासरच्यांकडून करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने टोचून बोलणे, मारहाण व मानसिक छळ केला. २०२३ मध्ये रस्ते अपघातात पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर सासरच्यांचा छळ अधिकच वाढल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दुसऱ्या घटनेत तपोवन रस्ता (सावेडी) परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती अंशुल चुघ, सासू जनक चुघ, सासरे अर्जन चुघ (सर्व रा. हरियाणा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा विवाह मार्च २०२३ मध्ये झाला होता. लग्नावेळी १५ तोळे सोने आणि मे २०२३ मध्ये २० लाख रूपये रोख देण्यात आले होते. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच पती अंशुल चुघ याला कॅनडाला जाण्यासाठी पीडितेच्या एम.टेक पदवीचे प्रमाणपत्र व अतिरिक्त पैशांची मागणी सुरू झाली. मागणी मान्य न केल्यास तिला उपाशी ठेवणे, शिवीगाळ करणे व जीवे मारण्याची धमकी देणे, असा प्रकार सुरू होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...