अहिल्यानगर । प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नगर जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यात ६९७ कोटी ८१ लाख २५ हजार १३९ रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा शुक्रवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ होऊन पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली.
यावेळी नगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्यातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. मात्र, अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृशी, महापूर यामारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे काही वेळेम पिकांचे नुकसान होते. यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही. असे शेतकरी बकबाकीदार आल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही.
या पार्श्वभूमीवर मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेत जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतक-यांच्या खात्यात १९७ कोटी ८९ लाख २५ हजार १३९ स्थयांचा लाभ देण्यात आला. ही रकम संबंधित शेतकन्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. यात नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या ८५ हजार ६५६ शेतकरी सभासदांना ९२२ कोटी ७४ लाख रुपये एवहा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तसेच अन्य राष्ट्रीयकृत बँकांमधील सहा हजार ९०३ शेतकरी सभासदांना ७५ कोटी ०७ लाख २५ हजार १३९ रुपने रकमेच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून शेतकन्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळेल. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकन्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांचरही लाभाची रकम टप्प्याटप्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनीही आधार प्रमाणीकरणाबी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दम्यान, या योजनेत नगर जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार ७१९ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलबर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत १ लाख ३२ हजार ५९१ पात्र शेतकन्यांच्या समावेश आहे. त्यापैकी १ लाख १५ हजार ६९२ शेतकऱ्यांनी आधम प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. त्यामुळे उर्वरित शेतक-यांनी या योजनेबा लाभ येण्यासाठी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, ८ हजार ३६ शेतक-यांनी अद्यापही फार्मम आवडी काढलेला नाहीत, अशा शेतकयांनी तात्काळ फामआयडी काढावा. तसेब ने मयत खातेदार आहेत अशा खात्यांच्या बाबतीत त्यांच्या बारसाने विकास संस्थेकडे, बँकेकडे वारसाची नींद लावून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. আসিবা, जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी केले आहे.




