Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : अहिल्यानगर, जामखेडमध्ये दोन गावठी कट्टे जप्त

Crime News : अहिल्यानगर, जामखेडमध्ये दोन गावठी कट्टे जप्त

एलसीबीची कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत भिंगार कॅम्प व जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र कारवाया करून दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे, मॅगझीन व दोन मोबाईल असा एकूण एक लाख 70 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत बिहारमधील युवकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, हद्दपार असलेल्या एका सराईत गुन्हेगारालाही गावठी कट्ट्यासह जेरबंद करण्यात आले आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित पसार आहे.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी (12 ऑगस्ट) रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन केले. यावेळी बिहारमधील तरूण गावठी कट्टा विक्री करण्यासाठी भिंगार नाला परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भिंगार नाला परिसरात सापळा रचला. यावेळी दोन संशयित इसम आढळून आल्याने पंचांसमक्ष त्यांची झडती घेण्यात आली. विकास कमल यादव (वय 18, रा. गंगापूर, ता. नखानूर, जि. मधुबनी, बिहार) आणि ओमकार अनिल शिंदे (वय 21, रा. भिंगार, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, स्टील मॅगझीन, दोन मोबाईल असा एकूण एक लाख 19 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या कारवाईत पथकाने जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह पकडले. सागर बाळू लोखंडे (वय 26, रा. आरोळेवस्ती, जामखेड) असे त्याचे नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार असतानाही जामखेड परिसरात मिळून आला. त्याच्या ताब्यात एक गावठी कट्टा, एक मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर गावठी कट्टा व जिवंत काडतूस हे कळसपिंप्री (ता. पाथर्डी) येथील गणेश दादासाहेब भवर याच्याकडून विक्री करण्यासाठी आणल्याचे सागर लोखंडे याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. दोघांविरूध्द जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...