Monday, October 19, 2026
HomeनाशिकNashik Accident News : भरधाव टँकरने चिरडल्याने महिला ठार; मुलगा, नातू गंभीर...

Nashik Accident News : भरधाव टँकरने चिरडल्याने महिला ठार; मुलगा, नातू गंभीर जखमी

अवजड वाहतूक थांबवण्याची मागणी

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

शहरातील राष्ट्रीय एकात्मता चौक रस्त्यावरून भरधाव वेगात जात असलेल्या डिझेल टँकरने पुढे जात असलेल्या दुचाकीस धडक देत फरफटत नेले या अपघातात (Accident) दुचाकीस्वार महिला टँकरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार (Killed) झाली. तर मुलगा व नातू गंभीरित्या जखमी झाले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

गत दोन महिन्यात शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांनी धडक दिल्याने बालिकेसह दोघा वृद्ध महिलांचा कुसुंबा रोडवर बळी गेला होता. आता कॅम्प रोडवर देखील भरधाव वेगात जात असलेल्या टँकरने (Tanker) पुढे जात असलेल्या दुचाकीस धडक दिल्याने मालेगाव उपचारासाठी आलेल्या येवला येथील महिलेचा आपले प्राण गमवावे लागले आहे. यामुळे शहरातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

दातावरील उपचारासाठी मालेगावी आलेल्या येवला (Yeola) येथील रूकसाना सलिम शेख ( ५५ रा. पटेल मशिद जवळ, येवला) हे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपला मुलगा अंजल सलीम शेख (२९) व लहान नातू हसन (४), सोबत एम.एच. १५ जी. क्यू . ०१८३ या ऑक्टीव्हा दुचाकीने मालेगाव कॅम्प येथील दातांच्या दवाखान्यात जात होते. दुचाकी अंजल शेख हा चालवत होता.

https://www.instagram.com/reel/DerUOjUGHj6/?utm_source=ig_web_copy_link&srtk=MzRlODBiNWFlZA==

दुपारी दीड वाजेच्या सुमारास कॉलेज रोडवरील एकात्मता चौकात त्यांच्या दुचाकीस पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एम.एच. ४१ ए.यु. ९१२७ या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल वाहक टँकरने धडक दिली. या धडकेत रूकसाना या रस्त्यावर फेकल्या जाऊन त्यांच्या डोक्यावरून टँकरचे पुढील चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर अंजल शेख व हसन शेख हे दोघे गंभीररित्या जखमी झाले भरधाव टँकरने दुचाकी पाठीमागून धडक दिल्यानंतर काही अंतर अक्षरशा फरफटत नेल्याचे दिसून आले आहे.

यामुळे शहरात (City) देखील अवजड वाहन चालक बेदरकारपणे चालवत असल्याचे आजच्या घटनेने पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. या अपघातानंतर कॅम्प रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल करीत रूकसाना यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रूग्णालयात हलवला. पोलिसांनी टँकरसह चालकास ताब्यात घेत विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत हा चौथा भीषण अपघात असून या अपघाताचे कारणही अवजड वाहतूक हेच आहे. शहरातील कुसुंबा रस्त्यावरील अवजड वाहतूक दिवसा बंद ठेवण्यात येत असल्याने वाहन चालक पर्यायी रस्ता शोधतात. या रस्त्याने येणारी बहुसंख्य वाहने देवरे वस्ती मार्गे कॅम्प भागात येतात. तेथून ती नामपूर रोड, रावळगाव नाका, कॅम्प रोडने शहरातून जातात. या अवजड वाहतूकी संदर्भात अनेकवेळा आंदोलने झाली. मात्र अद्याप या संदर्भात निश्चित कारवाई झालेली नाही, तसेच यावर पर्याय शोधला जात नसल्याने निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याने शहरातून संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 225 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2328 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब...