Thursday, September 10, 2026
HomeनगरCrime News : बोअरवेलच्या वादातून खडकीत दोन गट आमनेसामने

Crime News : बोअरवेलच्या वादातून खडकीत दोन गट आमनेसामने

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

तालुक्यातील खडकी गावात समाईक शेतजमिनीवरील बोअरवेलमध्ये मोटार बसविण्याच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना गुरूवारी (4 जून) दुपारी घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप करत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या असून, पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण 11 जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी शिवारातील गायरान गट क्रमांक 181 मधील समाईक बांधावरील जुन्या बोअरवेलमध्ये इलेक्ट्रिक मोटार बसविण्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला. संबंधित बोअरवेलवर दोन्ही बाजूंकडून हक्क सांगितला जात असून त्यातूनच वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे.
मिरा जिमदार काळे (वय 40, रा. खडकी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वायसर जिमदार काळे, जितू वायसर काळे, धनू वळखावण्या काळे, स्वतीप वळखावण्या काळे, शरद वायसर काळे व प्रियंका जितु काळे (सर्व रा. खडकी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दुसर्‍या गटाच्या प्रियंका जितेंद्र काळे (वय 22, रा. खडकी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्याण जिमदार काळे, मिरा जिमदार काळे, संदीप पाराजी चव्हाण, छाया किसन भोसले, आकाबाई वायशा भोसले (सर्व रा. खडकी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून पुन्हा प्रादेशिक वादाची ठिगणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावरून नगर आणि पुणे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच, नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी आपली आक्रमक आणि ठाम भूमिका स्पष्ट केली...