Friday, October 30, 2026
HomeनगरAMC : फ्लेक्समुक्त नगरसाठी मनपाचा पुढाकार

AMC : फ्लेक्समुक्त नगरसाठी मनपाचा पुढाकार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहराचे विद्रुपीकरण रोखून अहिल्यानगरला फ्लेक्समुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक आणि अन्य ठिकाणी लावण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या फ्लेक्सवर बंदी घालण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेसमोर मंजुरीसाठी सादर केला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी यासंदर्भात दिलेले पत्र आणि उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेतील आदेशांची दखल घेऊन अतिक्रमण विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास शहरात परवानगी असलेल्या आणि विनापरवानगी लावल्या जाणार्‍या फ्लेक्सवरही बंदी लागू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरातील प्रमुख चौक, मोक्याच्या जागा आणि सार्वजनिक रस्त्यांवर विविध कारणांसाठी फ्लेक्स लावण्याचे प्रमाण वाढले आहे. सण-उत्सवांच्या शुभेच्छा, वाढदिवस, राजकीय जाहिरातबाजी तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठ्या आकाराचे फ्लेक्स आणि होर्डिंग्ज उभारले जातात. यापैकी अनेक फ्लेक्स विनापरवानगी लावले जात असल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेला वारंवार मोहीम राबवावी लागते. त्यासाठी मनुष्यबळ आणि वेळ खर्च होत असून, शहरातील अतिक्रमणाचा प्रश्नही कायम राहत आहे.

फ्लेक्स लावण्यासाठी अनेक ठिकाणी उभारण्यात येणार्‍या कमानी आणि मोठ्या जाहिरात फलकांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. हे फलक किंवा त्यांची संरचना कोसळल्यास जीवितहानी होण्याबरोबरच मालमत्तेचेही नुकसान होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून शहरात केवळ अनधिकृत फ्लेक्स हटविण्याऐवजी सर्व प्रकारच्या फ्लेक्सवर बंदी घालण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार ‘फ्लेक्समुक्त अहिल्यानगर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Crime News : एमडी ड्रग्ज प्रकरणात 23 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar तोफखाना पोलिसांनी पकडलेल्या मॅफेड्रॉन (एमडी) प्रकरणात न्यायालयाने संशयित आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीची साखळी...