Monday, September 28, 2026
HomeनगरAhilyanagar Election Result : अहिल्यानगर मधील प्रभाग ३ मध्ये महायुतीचे वर्चस्व; तीन...

Ahilyanagar Election Result : अहिल्यानगर मधील प्रभाग ३ मध्ये महायुतीचे वर्चस्व; तीन जागांवर विजय, ठाकरे गटाचेही खाते उघडले

अहिल्यानगर । प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेली अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक अखेर गुरुवारी (दि. १५) पार पडली. अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या मतदानानंतर आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या निकालांमध्ये प्रभाग ३ चे चित्र स्पष्ट झाले असून, येथे महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

- Advertisement -

प्रभाग ३ मधील विजयी उमेदवार
प्रभाग ३ मध्ये चौरंगी लढत पाहायला मिळाली. यामध्ये महायुतीने मुसंडी मारत ४ पैकी ३ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या उमेदवारांनी येथे विजयाचा गुलाल उधळला आहे. विजयी उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

ऋग्वेद गंधे (भाजप)

ज्योती गाडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)

गौरी बोरकर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)

या तीन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असले, तर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराने येथे कडवी झुंज दिली. प्रभाग ३ मधून ठाकरे गटाचे योगीराज गाडे यांनी विजय मिळवत आपले खाते उघडले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...