Monday, April 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBhandardara Dam : अखेर भंडारदरा धरण भरले; विसर्ग सुरु, निळवंडेत पाण्याची विक्रमी...

Bhandardara Dam : अखेर भंडारदरा धरण भरले; विसर्ग सुरु, निळवंडेत पाण्याची विक्रमी आवक

अकोले | प्रतिनिधी | Akole

अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची जीवनरेखा असणारे भंडारदरा धरण काल पहाटे भरले. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून निळवंडे धरणातूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हे धरणही येत्या काही तासांत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची सततधार सुरू आहे.भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे सात इंच तर घाटघरला साडे सहा इंच पाऊस पडला. क्षेत्रात कालपासून सुरू असणार्‍या या धुवाधार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. मागील 24 तासांत भंडारदरा धरणात 789 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. धरणाचा पाणीसाठा काल सकाळी 10हजार 886 दलघफू म्हणजेच सुमारे 99 टक्के झाला होता. धरणाचे जलाशय परिचलन सूचीनुसार धरणाची पाणी पातळी व पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी पहाटे पासूनच धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

सकाळी भंडारदरा धरणातून 12 हजार 231 क्युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत होते. त्यासाठी धरणाच्या स्पीलवेची दारे काल पुन्हा वर उचलण्यात आली. स्पीलवे मधून 11 हजार 406 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 825 क्युसेक विसर्ग सुरू होता. मात्र धरणात प्रचंड प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्यामुळे भंडारदर्‍याच्या विसर्ग नंतर 20 हजार 863 क्युसेक पर्यंत वाढविण्यात आला. भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी कृष्णवंतीचे 2 हजार 199 क्युसेक पाणी आणि ओढ्या नाल्याचे पाणी निळवंडे धरणात जमा होत होते. रंधा धबधबा येथून हे पाणी निळवंडे जलाशयात कोसळत असल्यामुळे रंधा धबधब्याने रौद्र रूप धारण केले होते.

निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे या धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निळवंडे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. सुरुवातीला 850 क्युसेक पर्यंत असणारा विसर्ग नंतर 963 क्युसेक पर्यंत वाढविण्यात आला. संध्याकाळी पाण्याची आवक काहीशी कमी झाली. भंडारदरातून 12835 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. तर वाकी धरणातून 1573 क्युसेकने पाणी सुरू होते. असे एकूण 14408 क्युसेकने निळवंडेत पाणी येत आहे. प्रवरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांच्या मार्गदर्शना खाली कर्मचारी वसंत भालेराव, प्रकाश चव्हाण, रमेश सोनवणे, बाळू भांगरे, चंदू भगत, चंद्रभान शिंदे आदी धरण स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जून, जुलै महिन्यात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भंडारदरा धरण जुलै महिन्यातच भरण्याच्या मार्गावर होते.मात्र जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरण पूर्ण क्षमतेने भरु न देता पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. पुढे ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रातून पाऊस जवळपास गायब झाला. धरण 15 ऑगस्ट पूर्वी भरण्याची अनेक वर्षाची परंपरा खंडित झाली.

15 ऑगस्ट ला भंडारदर्याला आलेले हजारो पर्यटक त्यामुळे काहीसे निराश झाले. मात्र तीन दिवसांपूर्वी पाणलोट क्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाले. धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला. कालपासून पावसाने पाणलोट क्षेत्रास झोडपून काढले. त्यामुळे आज पहाटे धरण भरले आणि धरण भरण्याची उत्सुकता अखेर संपुष्टात आली.

आजचा व आज पर्यंतचा एकूण पाऊस मिली मीटर मध्ये पुढील प्रमाणे ; भंडारदरा 105 (1976), घाटघर 160 (4026), पांजरे 105 (2418), रतनवाडी 170 (4114), वाकी 102 (1676), निळवंडे धरण 63,(850), आढळा धरण 21 (244), अकोले 56 (613)

ताज्या बातम्या

Crime News : संगमनेरात 8 लाख 68 हजाराचे गोमांस जप्त

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरामध्ये कत्तलखाने (Slaughterhouses) उध्वस्त केल्यानंतर पुन्हा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) रविवारी (दि.5) भारतनगर परिसरात छापा (Raid) टाकून 8...