Wednesday, June 10, 2026
Homeनगरअहिल्यानगरच्या महापौर-उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट!

अहिल्यानगरच्या महापौर-उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट!

महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय जाधव अर्ज दाखल करणार

अहिल्यानगर | प्रतिनिधी
शहराच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, युतीमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या ज्योती गाडे महापौरपदासाठी, तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौरपदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अहिल्यानगर महानगरपालिकेत एकूण ६८ नगरसेवक आहेत. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (AP) युतीकडे ५२ नगरसेवकांचे मोठे संख्याबळ असल्याने युतीचा विजय निश्चित मानला जात आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

- Advertisement -

या बैठकीत केवळ नावांचीच चर्चा झाली नाही, तर सत्तेच्या कालावधीबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री विखे पाटील यांच्या सूचनेनुसार, नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असेल, असे ठरवण्यात आले आहे. यामुळे युतीमधील इतर इच्छुकांनाही भविष्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात महायुतीमध्ये एकत्र असले तरी, अहिल्यानगर महानगरपालिकेत मात्र राजकीय समीकरणे वेगळी पाहायला मिळत आहेत. १० नगरसेवक असलेल्या शिवसेना (शिंदे गट) ला या सत्तासमीकरणातून बाहेर ठेवण्यात आले असून, त्यांना आता विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दानपेट्या फाेडणारा गजाआड; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत,...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरातील विविध मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला (Criminal) गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक (Arrested) केली आहे....