Friday, October 30, 2026
Homeक्राईमCrime News : एमडी ड्रग्ज प्रकरणात 23 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

Crime News : एमडी ड्रग्ज प्रकरणात 23 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात 56 आरोपी निष्पन्न

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तोफखाना पोलिसांनी पकडलेल्या मॅफेड्रॉन (एमडी) प्रकरणात न्यायालयाने संशयित आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीची साखळी उघड करण्याच्या दृष्टीने तपास करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत 56 आरोपी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्यापैकी 23 जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जुलै रोजी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली होती. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून 10 आरोपी निष्पन्न करत सात जणांना अटक केली होती. तपासादरम्यान त्रुटी आढळून आल्याने आणि कथित आरोपांवरून सदरचा गुन्हा तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश अधीक्षक सुदर्शन यांनी दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, अंमलदार विकास साळवे, संतोष खैरे, शाहीद शेख, संदीप पवार, पंकज व्यवहारे, विजय ठोंबरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.

या पथकाने अटक आरोपींकडून अंमली पदार्थ कोठून आणले जात होते आणि ते कोणाला विकले जात होते, याचा शोध घेण्यासाठी तपास केला. या तपासातून गुन्ह्याची पुढील आणि मागील साखळी (फॉरवर्ड लिंक व बॅकवर्ड लिंक) शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून एकूण 56 आरोपी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यापैकी 23 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. हे अर्ज मंजूर होऊ नयेत यासाठी तपासी अधिकारी संदीप दरवडे यांनी न्यायालयात हजर राहून पुराव्यांच्या आधारे कायदेशीर बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.

अटकेतील आरोपी
जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख, वसिम खलिल बागवान, जमीर निसार शेख, अलीरजा शकील शेख, मोहंमद ऊर्फ कासिफ सज्जाद खान, परवेज ऊर्फ अप्पु खड्डा असदअली सय्यद, शाहरूख ऊर्फ पार्टी असलम शेख, विजय ऊर्फ घाज्या अनिल बोर्डे (सर्व रा. मुकुंदनगर), दानीश फारूक शेख (रा. तांबटकर गल्ली), शाहीद शकील शेख, साद इक्बाल शेख, अनिकेत राहुल गायकवाड (सर्व रा. पुणे), दिनेश तुषार यादव (रा. सावेडी), कामरान कलीम शेख, साजिद ताहेर शेख ऊर्फ मुंबई (रा. भिंगार), अशरफ ऊर्फ हाजी नदीम शेख, अझहर वाहीदअली सय्यद (रा. झेंडीगेट), अरशान रशीद सय्यद ऊर्फ मामा (फकीरवाडा), झुल्करनेन अमनउल्लाशाहीद सय्यद (रा. ख्रिस्तगल्ली), आफताब ऊर्फ तौफिक राजु पठाण (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर), अमिन शौकत शेख (रा. टाकळीकाझी, ता. अहिल्यानगर), नीलेश दीपक जाधव (रा. शिर्डी, ता. राहाता).

ताज्या बातम्या

AMC : फ्लेक्समुक्त नगरसाठी मनपाचा पुढाकार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहराचे विद्रुपीकरण रोखून अहिल्यानगरला फ्लेक्समुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक आणि अन्य ठिकाणी लावण्यात येणार्‍या सर्व...