Monday, September 7, 2026
Homeनगरअपघातात एकाचा मृत्यू; चौघे जखमी

अपघातात एकाचा मृत्यू; चौघे जखमी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

अहिल्यानगर- पुणे रस्त्याने भरधाव वेगात जाणार्‍या मालट्रकने पुढे चाललेल्या चारचाकी वाहनास पाठीमागून कट मारल्याने चारचाकी वाहन पलटी झाले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (17 डिसेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चास (ता. नगर) घाट येथे घडली. अहिल्यानगर- पुणे रस्त्याने भरधाव वेगात जाणार्‍या मालट्रक (एमएच 17 एझेड 5274) वरील चालकाने पुढे चाललेल्या चारचाकी वाहनास पाठीमागून कट मारल्याने चारचाकी वाहन पलटी झाले.

या अपघातात अमोल यशवंत देवधर यांचा मृत्यू झाला तर वाहनातील सुमित नारायण राडीकर, योगेश जोशी, रूई राडीकर व मृण्मयी देवधर (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर ) हे जखमी झाले आहेत. अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळाजवळील नागरिकांनी जखमींना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात जखमी सुमित वाडीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ सप्टेंबर २०२६ – उच्चस्तरीय समितीची कठीण ‘परीक्षा’

0
महाराष्ट्रातील शासकीय नोकरभरती परीक्षांमधील सातत्याने समोर येणारे गैरव्यवहार आणि पेपरफुटीचे सत्र थांबवण्यासाठी राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाच्या (सेवा) अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या...