Monday, September 28, 2026
HomeनाशिकNashik Crime News : डीजेच्या अतिआवाजाची रील भोवली; नाशिकमध्ये ३६ गणेश मंडळांवर...

Nashik Crime News : डीजेच्या अतिआवाजाची रील भोवली; नाशिकमध्ये ३६ गणेश मंडळांवर गुन्हे

एक लाखांचे डिपॉझिट जप्त

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गणेश विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan Mirvnuk) पारंपारिक वाद्यांच्या गजराऐवजी डीजे अन् साऊंड सिस्टीमच्या अतिआवाजाची आणि इन्स्टाग्रामवर कोणाचा आवाज मोठ्ठा? अशी डीजेची स्पर्धा भरवणाऱ्या गणेश मंडळांना पोलिसांचा (Police) चांगलाच दणका बसला आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व आदेश धाब्यावर बसवून कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डीजे आणि साऊंड सिस्टीमचा धिंगाणा घालणाऱ्या भद्रकाली, पंचवटी व मुंबईनाका हद्दीतील २९ व देवळाली कॅम्प, उपनगर व नाशिकराेड, अंबड हद्दीतील सात अशा ३६ गणेशाेत्सव मंडळांसह (Ganesh Mandals) पदाधिकारी व डीजे ऑपरेटवर पाेलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रात रविवारी (दि. २७) सायंकाळपर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच नियम मोडणाऱ्या या सर्व मंडळांचे प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनामत रक्रम (डिपॉझिट) जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत गुन्हे दाखल होण्यामागे सोशल मीडिया’ आणि इन्स्टाग्राम रील्स हे मुख्य कारण ठरले आहे.

शुक्रवारी (दि. २५) विसर्जन मिरवणूक असताना, बुधवारी (दि. २३) रात्रीपासूनच विविध गणेश मंडळांनी आपापल्या डीजे व साऊंड सिस्टीमच्या आवाजाचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. गुरुवारी (दि. २४) हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. परिणामी, शुक्रवारी सायंकाळी साडेसातनंतर मिरवणूक मार्गावर अचानक तरुणाईसह (Youth) हुल्लडबाजांची तुफान गर्दी जमली. मिरवणुकीत प्रत्यक्ष डीजे वाजवताना अमुक मंडळाचा आवाज मोठा की तमुक मंडळाचा?, अशा आशयाच्या रील्स बनवून कर्णकर्कशपणाची खुली स्पर्धाच शहरात भरवण्यात आली होती. या स्पर्धेमुळेच मिरवणुकीत डीजेचा दणदणाट आणि ध्वनीप्रदूषण पराकोटीला पोहोचल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

​पोलीस आयुक्तांच्या आदेश

​राजकीय नेत्यांचा दबाव आणि मंडळांच्या आग्रहास्तव नाशिकमध्ये (Nashik) २०२१ नंतर २०२३ आणि यंदा २०२६ मध्ये पुन्हा एकदा साऊंड सिस्टीमला परवानगी मिळाली होती. परंतु, या सवलतीचा गैरफायदा घेत ध्वनीमर्यादेचे प्रचंड उल्लंघन झाले. आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिसांच्या विशेष पथकाने या अतिआवाजाची पंचनाम्यासह नोंद घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी आणि युवराज पतकी यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोद वाघ यांच्यामार्फत उपायुक्त मोनिका राऊत यांच्याकडे अहवाल सादर केला. या अहवालानुसार संबंधित मंडळांचे अध्यक्ष आणि डीजे चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्य मिरवणुकीव्यतिरिक्त उपनगरांमध्येही कारवाईचे सत्र सुरू असून गुन्हे दाखल होणाऱ्या मंडळांची संख्या आणखी वाढणार आहे.

पोलिसांचे मौन!

​एकीकडे डीजे आणि ध्वनीप्रदूषणावर कारवाईचा बडगा उगारला जात असताना, दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गुन्हे दाखल झालेल्या २९ मंडळांवर कारवाई झाल्याचे निश्चित असतानाही, रविवारी रात्री उशिरापर्यंत आयुक्तालयाकडून या ३६ मंडळांची अधिकृत यादी माध्यम किंवा जनतेसाठी जाहीर करण्यात आलेली नव्हती. ​स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी अद्याप अहवाल प्राप्त होत आहेत, नियमांनुसार कायदेशीर कारवाई करू असे मोघम आणि शासकीय उत्तर देऊन मौन बाळगणे पसंत केले. त्यामुळे नेमक्या कोणत्या बड्या राजकीय आश्रय असलेल्या मंडळांवर कारवाई झाली आणि कोणाला पाठीशी घातले जात आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्या

मुंढे इफेक्ट फक्त किचनमध्ये नको, एफडीएच्या कार्यालयातही दिसावा; संजय राऊतांचे तुकाराम...

0
मुंबई । Mumbai आपल्या शिस्तबद्ध आणि कडक कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय वर्तुळात ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे...