Sunday, October 18, 2026
Homeनगरएसपी कार्यालयासमोर विनापरवाना प्रतिमेचे प्रदर्शन व घोषणाबाजी; माजी नगरसेविकेसह 20 ते 30...

एसपी कार्यालयासमोर विनापरवाना प्रतिमेचे प्रदर्शन व घोषणाबाजी; माजी नगरसेविकेसह 20 ते 30 महिलांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून जिल्ह्यात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले. तसेच विनापरवाना जाहीर घोषणाबाजी व प्रतिमेचे प्रदर्शन केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पाच महिलांसह 20 ते 30 अनोळखी महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अंमलदार अजय गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. माजी नगरसेविका शेख नसीम खानसाहेब, शेख मुन्नी अयाज, शेख निदा जावेद, शेख सुमय्या झाकिर, आयशा खान व इतर 20 ते 30 अनोळखी महिलांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणारी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी कोलकत्याच्या नाझिया इलाही खान यांच्याविरूध्द तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील महिलांनी केली आहे. या मागणीसाठी बुधवारी (1 जुलै) सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे संबंधित महिलांनी एकत्र येत नाझिया इलाही खान यांच्या प्रतिमेचे विनापरवाना प्रदर्शन केले आणि जाहीर घोषणाबाजी केली.

दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी 19 जून रोजी काढलेल्या आदेशानुसार 2 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू होते. या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका संबंधित महिलांवर ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...