Friday, August 21, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगरकरांकडून सर्रास वाहतूक नियमांचा भंग

Ahilyanagar : अहिल्यानगरकरांकडून सर्रास वाहतूक नियमांचा भंग

एका दिवसात 446 वाहनांवर कारवाई || 3.91 लाखांचा दंड वसूल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी मंगळवारी (28 जुलै) विशेष धडक मोहीम राबवत कारवाई केली. शहरातील विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी करून एकूण 446 वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, तीन लाख 91 हजार 250 रूपयांचा दंड आकारण्यात आला.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी केले. यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. शहरातील प्रमुख चौक, रस्ते व संवेदनशील ठिकाणी अचानक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली.

या वेळी फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट नसलेली वाहने, एचएसआरपी नंबर प्लेट नसलेली वाहने, वाहन चालविताना परवाना (लायसन्स) जवळ नसणे, ट्रिपल सीट प्रवास, काळ्या काचा, मॉडिफाइड (फटाका) सायलेन्सर, मद्यप्राशन करून वाहन चालविणे (ड्रंक अँड ड्राइव्ह), अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे तसेच सीट बेल्टचा वापर न करणे अशा विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत एकाच दिवसात 446 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण तीन लाख 91 हजार 250 इतका दंड आकारण्यात आला.

नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. फॅन्सी नंबर प्लेट, बुलेटला फटाका सायलेन्सर बसविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवून घेणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरूध्द यापुढेही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस उपअधीक्षक, अहिल्यानगर शहर.

ताज्या बातम्या

पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक राजकारणात तत्त्व, निष्ठा, विचार आणि संघटनात्मक कार्यापेक्षा सत्ता व लाभाच्या पदांना आज किती महत्त्व आले आहे,...