Wednesday, November 25, 2026
Homeक्राईमCrime News : बेलापूर येथे जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

Crime News : बेलापूर येथे जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

10 जणांवर गुन्हा दाखल || 6.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 10 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 6 लाख 30 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक 23 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आली.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत होते. यावेळी बेलापूर बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या टपरीमध्ये काही जण सोरट पानावरील चित्रावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी खात्री करून छापा टाकला. तेथे जुगार खेळताना आढळून आलेल्या चांगदेव परसराम देखणे (वय 42, रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर), सुरज विलास कुमावत (वय 32, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर), विनायक ज्ञानेश्वर मोरे (वय 22, रा. बेलापूर), सतीष अनिल गायकवाड (वय 27, रा. वडारवाडा, बेलापूर), विकास विठ्ठल गायकवाड (वय 25, रा. उंबरगाव), गणेश सोपान टाक (वय 40, रा. टाकगल्ली, बेलापूर), संकेत श्रीराम कुमावत (वय 28, रा. बेलापूर), सचिन श्याम खाजेकर (वय 35, रा. बेलापूर), सुनिल विजय खरात (वय 23, रा. खटकळी, पढेगाव रोड), संतोष बबन गाडे (वय 36, रा. कुर्‍हेवस्ती, बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पंचासमक्ष घेण्यात आलेल्या अंगझडतीत आरोपींच्या ताब्यातून 6,30,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनिल मालणकर, रमीजराजा आत्तार आणि जालींदर साखरे यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Crime News : माजी नगरसेवक पवार यांच्या घरफोडीचा छडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या पाइपलाइन रोड परिसरातील घरफोडीचा छडा लावण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी हिंगोली येथील अजय भुक्तर याला...