Saturday, October 17, 2026
Homeनगरसप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटच्या झळा; आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटच्या झळा; आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सकाळी १० नंतरच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून, सप्टेंबर महिन्यातच नागरिकांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागत आहे. उकाड्यामुळे रात्रीच्या वेळी पंखे, कुलर आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच वातावरणात बदल होत असून हवामान विभागाने १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान नगर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत.

- Advertisement -

सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे नगर जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागात पाऊस नसल्याने वाळणाऱ्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कृषी पंपांचा वापर वाढला आहे. घरगुती उपकरणांचा वापर आणि कृषी क्षेत्राकडून अचानक वाढलेली विजेची मागणी यामुळे जिल्ह्यात सध्या लोडशेडिंगचे प्रमाण वाढले आहे. अनेक ग्रामीण भागांत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने सण-उत्सवाच्या काळात नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यानंतर २४ सप्टेंबरनंतर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यास परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळून काही प्रमाणात फायदा होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

रब्बी हंगामावर मोठे संकट

जिल्ह्यात सध्या ६ लाख ९० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. या पिकांना गेल्या महिनाभरापासून पावसाची प्रतिक्षा असून परतीचा पाऊस न झाल्यास त्याचा मोठा फटका रब्बी हंगामातील पेरण्यांना बसणार असून यामुळे यंदा नगर जिल्ह्यातील रब्बी हंगाम संकाट असल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : शिपाई की एजंट? उच्च न्यायालयात कुलकर्णीचा कारनामा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण विभागातील (Education Department) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात केवळ शिपाई असल्याचे सांगून बचाव करू पाहणाऱ्या अमोल रमेश कुलकर्णी याला मुंबई...