Tuesday, September 8, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर झेडपीची निवडणूक लांबणीवर

Ahilyanagar : अहिल्यानगर झेडपीची निवडणूक लांबणीवर

श्रीरामपूर आणि अकोलेतील पंचायत समिती गणांचे आरक्षण अधिक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. मात्र, यात अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा समावेश नाही. अकोले व श्रीरामपूर या दोन पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडल्याने अहिल्यानगर जि. प. व पं. स. निवडणूक दुसर्‍या टप्प्यात होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आतापर्यंत तिसर्‍यांदा हुलकावणी मिळाली आहे. यापूर्वी 2022 मध्ये पाच वर्षाची मुदत संपल्यावर, त्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच्या पालिका निवडणुकांच्या वेळी आणि आता तिसर्‍यांदा झेडपी व पंचायत समित्यांची निवडणूक जाहिर होईल अशी अपेक्षा असताना पुन्हा नगर झेडपीची निवडणूक लांबली. आधी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूका, तसेच सध्या सुरू असलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुका आटोपल्यानंतर राज्यातील 32 जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

मात्र, 32 पैकी 20 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांचाच निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला. तेथे 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यात अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा समावेश नाही. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने त्यास सर्वोच्च न्यायालयाकडून 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ घेतली. उर्वरित 20 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याने आयोगाने तेथे निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. तेथे पुढील टप्प्यात म्हणजे दहावी-बारावीची परीक्षा झाल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.

21 जानेवारीला पुन्हा सर्वोेच्च सुनावणी
ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे, त्याबाबत 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने आरक्षण मर्यादा ठरवून दिली तर पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये फेर आरक्षण कार्यक्रम घेऊन आरक्षण ठरवावे लागेल. तसे झाल्यास केवळ अकोले व श्रीरामपूर पंचायत समितीमध्येच आरक्षणाची फेररचना करावी लागेल. जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जैसे थेच राहील.

जिल्हा परिषदेत 48 टक्के आरक्षण
जिल्हा परिषदेच्या एकूण 75 जागा आहेत. त्यात सर्वसाधारण 39 व आरक्षित 36 (अनु. जाती 9, जमाती 7, ओबीसी 20) आहेत. यात आरक्षणाचे प्रमाण 48 टक्के आहे. त्यामुळे ही आरक्षण मर्यादा 50 टक्केच्या आत आहे.

इच्छुकांचा पुन्हा हिरमोड
गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेचे इच्छूक निवडणुकीची वाट पाहत आहेत. परंतु प्रत्येक वेळी इच्छुकांना हुलकावणी मिळत आहे. त्यामुळे आता कधी निवडणूक जाहीर होते, याकडे त्यांचे लक्ष असेल.

अकोलेचे 83 तर श्रीरामपूरचे 63 टक्के आरक्षण
अहिल्यानगर जिल्हा परिषदेने आरक्षण मर्यादा ओलांडलेली नाही. मात्र, जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर येथील पंचायत समितीचे आरक्षण 50 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. अकोले पंचायत समितीच्या 12 जागा असून तेथे सर्वसाधारणसाठी केवळ 2 जागा आहेत. तर उर्वरित 10 जागा विविध जात प्रवर्गांना आरक्षित आहेत. त्यामुळे तेथील आरक्षण 83 टक्क्यांवर जाते. श्रीरामपूर पं. स.मध्ये 8 जागा असून तेथेही 5 जागा आरक्षित, तर 3 खुल्या प्रवर्गासाठी आहेत. त्यामुळे तेथे आरक्षण 63 टक्के झाले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पेठ रोडवर एमडी विक्रीचा प्रयत्न फसला; दोघांना...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati पेठ रोडवरील (Peth Road) म्हसरूळ परिसरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अमली पदार्थविरोधी पथकाने (Anti-Narcotics...