अकोले । प्रतिनीधी
भंडारदरा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २६ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. सद्दाम शेख,(वय 26, रा.पूनमनगर, शिर्डी) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाची सुरक्षितता राम भरोसे असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
हे देखील वाचा : “महायुतीत अजितदादांचं खच्चीकरण, त्यांनी आंबेडकरांसोबत…”; NCP नेत्याचं खळबळजनक विधान
निसर्गाचं लेणं समजल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमानावर पर्यटक गर्दी करत असतात. आज शिर्डी परिसरातील सहा तरुण भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. त्यातील काही जण भंडारदरा धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता त्यातील सद्दाम शेख हा तरुण पाण्यात बुडाल्याने त्याला जलसमाधी मिळाली आहे. राजूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले.स्थानिकांच्या मदतीने मयत सद्दाम चा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
हे देखील वाचा : धक्कादायक! कृषी विभागाचे बियाणे उगवलंच नाही; शेतकऱ्यांवर कोसळले संकट
या तरुणांपैकी काहींचा पाण्यात धिंगाणा घालतानांचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पर्यटकांनी इथला निसर्ग न्याहळतांना अतिरेक करू नये, आचारसंहिता पालन करावी अन्यथा अशा दुदैवी घटनांना कुणीच रोखू शकत नाही हे तितकेच खरे आहे.
हे देखील वाचा : पावसाच्या खंडामुळे धाकधूक वाढली; खरीप हंगामाच्या किती हेक्टरवर पेरण्या पूर्ण?