Friday, September 20, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायती होणार मालामाल

नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायती होणार मालामाल

15 वा वित्त आयोग 45 कोटी 23 लाखांचा निधी प्रात्त || प्रशासक असलेल्या झेडपी, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना निधी नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन 2021-22 च्या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीच्या (टाईड ग्रँट) स्वरूपातील दुसर्‍या हप्त्यापोटी 159 कोटी 34 लाख 40 हजार रुपये इतका निधी मुक्त केला आहे. हा निधी आता ग्रामपंचायतींना मिळणार आहे. तसेच राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2024-25 वर्षाच्या अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्यापोटी 647 कोटी 76 लाख 67 हजार क्षलपये असा एकूण 807 कोटी 11 लाख 7 हजार क्षलपयांचा निधी मिळणार आहे. यात नगर जिल्ह्यातील एकूण 1323 ग्रामपंचायतींचा 45 कोटी 23 लाख 78 हजार रुपयांचा समावेश आहे. या निधीमुळे या ग्रामपंचायती मालामाल होणार असून गावागावांतील विविध कामांना वेग येणार आहे.

पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी निधी मिळणार आहे. या निधीपैकी 80 टक्के निधी हा थेट गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना वितरीत केला जातो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रत्येकी 10 टक्के निधी दिला जातो. गावांना मोठा निधी मिळत असल्याने यामुळे गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे.

टाईड ग्रँटचा वापर स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरूस्ती, पेयजल पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलींग यासाठी करावयाचा आहे. टाईडटच्या 50% निधी हा वरील नमूद दोन बाबींसाठी करावयाचा आहे. जर वरील दोन बाबींपैकी एकाची पुर्णत: अमलबजावणी झाली असेल तर त्यासाठीचा निधी दुसर्‍या बाबीसाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीचा (अनटाईड ग्रँट) स्वरूपातील पहिल्या हप्त्यापोटी केंद्रशासनाकडून मुक्त करण्यात आलेला रू. 647.7667 कोटी इतका निधी राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना (वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विवरणपत्र अनुसार निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीव्दारे (बीम्सवर ) वितरीत करण्यात येत आहे. सदर निधी पंचायत राज संस्थाना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांमध्ये अनुक्रमे 10ः10ः80 या प्रमाणात वितरीत करण्यात येत आहे.

प्रशासक असलेल्या झेडपी,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना निधी नाही
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ज्या ग्रामपंचायतमध्ये प्रशासक कार्यरत आहेत अशा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचे वितरण केले जाणार नाही. सध्या अहमदनगरसह 26 जिल्हा परिषद 289 ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक आहेत. अशा सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचे वितरण सन 2024-25 च्या अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नाही. नगर झेडपी तसेच पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकराज असल्याने या संस्था या निधीला मुकणार आहेत.

ग्रामपंचायतींना असा मिळणार निधी
पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्यापोटी 35 कोटी 82 लाख 39 हजार रूपयांचा निधी तर केंद्रीय 15 व्या केंद्रिय वित्त आयोगाचा सन 2021-22 च्या बंधित निधीच्या दुसर्‍या हप्त्याच्या रोखून ठेवलेला 9 कोटी 41 लाख 39 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायती आणि त्यांना मिळालेला निधी.

(कंसात बंधित निधीच्या दुसर्‍या हप्त्याची रक्कम).
अकोले– ग्रामपंचायती 141- निधीची रक्कम 2 कोटी 78 लाख 51 हजार, (71 लाख 07 हजार), संगमनेर- ग्रामपंचायती-142-निधीची रक्कम 4 कोटी, 35 लाख 67 हजार, (1 कोटी 10 लाख 24 हजार).कोपरगाव- ग्रामपंचायती 72- निधीची रक्कम 2 कोटी 34 लाख 15 हजार (60 लाख 83 हजार). श्रीरामपूर- ग्रामपंचायती 50 निधीची रक्कम 1 कोटी 99 लाख 60 हजार, (51 लाख 77 हजार), राहाता-ग्रामपंचायती 50 -निधीची रक्कम 2 कोटी, 74 लाख 76 हजार, (68 लाख, 46 हजार), राहुरी – ग्रामपंचायती 81, निधीची रक्कम 2 कोटी 60 लाख 21 हजार, (66 लाख 08 हजार).शेवगाव- ग्रामपंचायती 88, निधीची रक्कम 2 कोटी, 10 लाख 49 हजार (54 लाख 15 हजार).पाथर्डी- ग्रामपंचायती 104, निधीची रक्कम 2 कोटी 33 लाख 58 हजार, (60 लाख 30 हजार).अहमदनगर- ग्रामपंचायती 101, निधीची रक्कम 2 कोटी 91 लाख 07 हजार (79 लाख 91 हजार).पारनेर- ग्रामपंचायती 112, निधीची रक्कम 2 कोटी 69 लाख 13 हजार (68 लाख 18 हजार). श्रीगोंदा- ग्रामपंचायती 84, निधीची रक्कम 2 कोटी 86 लाख 07 हजार (74 लाख 39 हजार).कर्जत- ग्रामपंचायती 72, निधीची रक्कम 1कोटी 79 लाख 02 हजार (56 लाख 84 हजार).जामखेड- ग्रामपंचायती 55, निधीची रक्कम 1 कोटी 17 लाख 08 हजार (31 लाख 03 हजार).नेवासा – ग्रामपंचायती 97, निधीची रक्कम 3कोटी 11 लाख 15 हजार (88 लाख 14 हजार).

- Advertisment -

ताज्या बातम्या