मुंबई | Mumbai
२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनी आणि तपास करणाऱ्या संस्थेवर काही प्रश्न उपस्थित केले होते. या पत्रकार परिषदेचा आज तिसरा भाग होता. याआधी रोहित पवार यांनी १० आणि १९ फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. आज मुंबईत तिसरी पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघाताच्या अहवालात किती त्रुटी आहेत हे दाखवून दिले आहे.
विमानतळाची रेकी झाली होती अशी लोकांची माहिती
आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी अजून एका महत्त्वाच्या मुद्याला हात घातला. “काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. याची आम्हाला पक्की माहिती नाही. पण त्या दिशेने चौकशी झाली पाहिजे. कालच्या अहवालात कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचे नाव दिलेले नाही. कागदपत्रात हेराफेरी होण्याची शक्यता असल्याने नाव दिले नसेल. २३ तारखेचा एएआयबीचा रिपोर्ट आहे. त्यात इन्व्हेस्टिगेटींग करणाऱ्यांचे नाव आहे. पण अजितदादांच्या रिपोर्टमध्ये नाव नाही. अजितदादांबाबतच असा भेदभाव का?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
क्रिमीनल अँगलने तपास व्हावा असे सांगतात पण,…
त्याचबोरबर व्ही. के. सिंग याने मुंबईत झालेल्या अपघातातील सगळे अवशेष दिल्लीला नेले होते असे कळतेय. क्रिमीनल ॲंगलने तपास व्हावा असे आम्हाला सांगतात, पण यात केवळ पुन्हा अपघात होऊ नये याबद्दल सांगितले आहे.
व्ही. के. सिंग हे आणि त्यांचा इन्शुरन्स एजंट सगळे या प्रकरणाला कॅज्युअली घेत आहे
ॲरोवर एफआयआर करा, मी असे का म्हणतो. कारण त्यानेच ही माहिती दिली होती की व्हिजिबिलिटी सगळे ठीक आहे, व्ही. के. सिंग हे आणि त्यांचा इन्शुरन्स एजंट सगळे या प्रकरणाला कॅज्युअली घेत आहे. ते अनुभवी पायलट होते त्यांना धावपट्टीची सगळी कल्पना होती. नियम असताना सुद्धा हा नियम का लावला गेला. नियम सांगतो की व्हीआयपी असताना व्हिजिबिलिटी कमी असताना सुद्धा त्यांनी हे विमान उतरवण्याचा निर्णय घेतला.
ऑडिओ क्लिप ऐकवली
रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्हीएसआर कंपनीच्या इन्शुरन्स एजंटची ऑडिओ क्लिप ऐकवली. बारामतीमधील माळी कुटुंबााला हा फोन आला होता. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना वकिलांनी काय म्हटले हे रोहित पवारांनी ऐकवले.
सीआयडी म्हणते योग्य दिशेने तपास सुरु पण,..
सीआयडीला आम्ही विचारलं तर ते सांगतात की आमचा योग्य दिशेने तपास सुरु आहे. पण योग्य दिशेने म्हणजे काय विचारलं तर ते सांगतात अहवाल आल्यानंतर आम्ही त्या अनुषंगाने तपास करु. मात्र अहवालात खूप त्रुटी आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.





