Sunday, April 19, 2026
Homeदेश विदेशAishanya Dwivedi: "बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या धाकावर…"; पहलगाम हल्ल्यातील शहिदाच्या पत्नीने बीसीसीआयला सुनावलं

Aishanya Dwivedi: “बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या धाकावर…”; पहलगाम हल्ल्यातील शहिदाच्या पत्नीने बीसीसीआयला सुनावलं

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून भाजपा आणि बीसीसीआय विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक क्रिकेटपटूही या सामन्याला विरोध करत आहेत. भारतीयांच्या मनात अद्यापही पहलगाम हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच, क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान संघादरम्यान क्रिकेटचा सामना होणार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी यावर टीका केली असून भारताने-पाकिस्तानविरुध्द खेळू नये अशी भूमिका मांडली आहे. यादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. ऐशान्या म्हणाली की, “पाकिस्तान या सामन्यातून मिळालेले पैसे दहशतवाद्यांवर खर्च करेल, जे पुन्हा आपल्यावर हल्ला करतील. आपण पाकिस्तानला ही संधी का देत आहोत?” असा सवाल ऐशान्या यांनी उपस्थित केला आहे.

बीसीसीआय त्या २६ कुटूंबाबद्दल भावनिक नाही?
बीसीसीआयला सुनावताना त्यांनी बोर्डाला दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या त्या २६ कुटुंबाप्रती संवेदनशीलता नाही का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. “बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तानमधील सामना स्वीकारायला नको होता. मला वाटते बीसीसीआय त्या २६ कुटुंबांबद्दल भावनिक नाही. ते पहलगाममधील हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर विसरले आहेत. मी आपल्या क्रिकेटपटूंना हेदेखील विचारू इच्छितो की ते असे का करत आहेत? त्यांनी पाकिस्तानी संघासोबत खेळण्यास का होकार दिला?’ ते पाकिस्तान संघासोबत खेळण्यास का तयार आहेत? असे म्हटले जाते की क्रिकेटपटू देशभक्त असतात.”

- Advertisement -

सामन्याच्या प्रायोजकांना, प्रसारकांना २६ कुटुंबांबद्दल काही कर्तव्य नाही का?
“देशभक्तीच्या या भावनेमुळेच राष्ट्रीय खेळ हॉकीपेक्षा जास्त लोक क्रिकेट पाहण्यास आणि खेळण्यास आवडतात. परंतु १-२ क्रिकेटपटू वगळता कोणीही पुढे येऊन म्हणाले नाही की, आपण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा. बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या धाकावर खेळण्यास भाग पाडू शकत नाही. त्यांनी देशासाठी उभे राहिले पाहिजे. परंतु ते तसे करत नाहीत. मी सामन्याच्या प्रायोजकांना आणि प्रसारकांना विचारू इच्छिते की, त्यांचे त्या २६ कुटुंबांबद्दल काही कर्तव्य नाही का?” असे ऐशान्याने म्हटले आहे.

म्हणून मी लोकांना सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करते
पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या केलेल्या कृत्याचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले की, “पाकिस्तानमधील सामन्यातून मिळणाऱ्या कमाईचा काय उपयोग होईल? यात काही शंका नाही की पाकिस्तान त्याचा वापर फक्त दहशतवादासाठी करेल. तो एक दहशतवादी देश आहे. तुम्ही त्यांना पैसे द्याल आणि ते पुन्हा आपल्यावर हल्ला करण्यासाठी त्याचा वापर करतील. मला हे समजते, पण लोकांना हे समजत नाही. म्हणूनच मी लोकांना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करते. तो पाहण्यासाठी जाऊ नका आणि त्यासाठी तुमचा टीव्हीही चालू करू नका”.

मला वाटते की माझा मुद्दा बीसीसीआयपर्यंत पोहोचला नाही
“पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने म्हटले होते की आम्ही पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत कोणताही क्रिकेट सामना खेळणार नाही. आम्ही त्यांच्या भूमीवर सामना खेळायला जाणार नाही आणि त्यांच्या खेळाडूंना आमच्या भूमीवर पाऊल ठेवू देणार नाही. पण बीसीसीआयने यावरही मार्ग काढला. आशिया कप २०२५ चा हा सामना दुबईमध्ये नियोजित आहे. असेही म्हटले जात आहे की भारत थेट पाकिस्तानशी खेळत नाही. भारत आशिया कपमध्ये खेळत आहे. मी बीसीसीआयला पाकिस्तानशी हा सामना न खेळण्याचे आवाहनही केले होते. पण मला वाटते की माझा मुद्दा बीसीसीआयपर्यंत पोहोचला नाही” असे म्हणत ऐशान्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Newasa : चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा संशयास्पद मृत्यू

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून सदर चोरट्याचा मृतदेह प्रथम ग्रामीण रुग्णालय...