Saturday, October 17, 2026
Homeनगरमनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार

वाळूतस्करी केल्याचा बारस्करांचा आरोप, ईडीकडे तक्रार

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारस्कर मनोज जरांगेंविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता अजय बारस्कर यांनी थेट ईडीमध्ये जरांगेंविरुद्ध तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे. अजय बारस्कर यांनी याबाबतची माहिती दिली आहे, ईडीच्या कार्यालयासमोरून ही माहिती त्यांनी सांगितली आहे. बारस्कर म्हणाले, मनोज जरांगे आणि त्यांचे जे सगळे सहकारी आहेत, त्या सर्वांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला, अवैध संपत्ती कमावली. मनोज जरांगे आणि त्यांच्या या सहकार्‍यांच्या या काळ्या धंद्याच्या विरोधात मी प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ईडीकडे अधिकृतरित्या तक्रार केलेली आहे.

- Advertisement -

मला ईडी कार्यालयाकडून बोलावणं आलं होतं. मी ईडी कार्यालयात जाऊन डेप्युटी डायरेक्टर यांच्याकडे मी माझी सगळी बाजू मांडली. त्यांच्याशी संबंधित काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे होते ते सगळे मी दिले आणि त्यांना विनंती केली, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे याचे जे काही सहकारी आहेत, पांडुरंग तारक, ईश्वर बलांडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम पुरणकर, संजय कटारे, स्वप्नील तारक, बद्रीनाथ तारक आणि त्याचा मेहुणा विलास खेडकर आणि इतर अनेक नावं आहेत. वाळूचा माफिया हा सगळ्यात मोठा त्यांचा धंदा आहे आणि ईडीकडे वाळूच्या धंद्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यांनी जो काही प्रचंड करोडो रुपयांचा, कल्पनाही करता येणार नाही, कमीत कमी हजार एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे, याची सगळी चौकशी करण्यात यावी. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, जो ईडीकडे आहे.

या सर्व लोकांना, गंगाधर काळकुटे असेल, तारक असतील जे काही सगळे माणसं आहेत, त्यांना चौकशीसाठी बोलवावं, त्यांच्या सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. डिफेंडर गाड्या कुठून आल्या? लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पैसे कुठून येतात? पांडुरंग तारकने 50 एकर जमीन घेतली, 28 एकर जमीन घेतली या सर्व विषयांसाठी आम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत, अशी माहित देखील अजय बारस्कर यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश; ‘मकोका’ अंतर्गत धडक कारवाई

0
पुणे | प्रतिनिधी शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला असून या...