Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? CM सोबतच्या बैठकीत काय झालं? प्रफुल्ल पटेलांनी सगळचं...

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? CM सोबतच्या बैठकीत काय झालं? प्रफुल्ल पटेलांनी सगळचं सांगितलं

मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर त्यांचे अकाली निधन झाले. दादांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याचा कारभार होता. त्यामुळे आता या खात्यांचा कारभार कोणाकडे द्यायचा आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे द्यायचे याची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खलबत सुरु झाली असून अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय होणार अशा चर्चा आताच सुरू झाल्या आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतील पक्ष असल्यामुळे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आल्यामुळे याबाबत चर्चा होणे साहजिकच आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (29 जानेवारी) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजित पवारांकडील खाती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हवीत, अशी भूमिका मांडल्याचे कळते. यासंदर्भात प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

- Advertisement -

सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्याशी चर्चा करुन निर्णय
देवेंद्र फडणवीसांसोबत आज प्राथमिक चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीसांना आम्ही येवढचे सांगितले की लवकरात लवकर निर्णय करायचा आहे. पक्षातील आमदारांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत. आज इतकेच आम्ही फक्त देवेंद्र फडणवीसांना सांगितले. सुनेत्रा पवार यांच्या नावाची आज चर्चा केली नाही. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करावी लागणार आहे. शक्य झाल्यास आज रात्री किंवा उद्या सकाळी आम्ही पवार कुटुंबाशी संवाद साधू,” कोणाला उपमुख्यमंत्रिपदावर बसवायचे हे आमदारांशी बोलून निर्णय घेणार आहोत. सगळ्यांच्या भावना समजून आम्ही निर्णय घेऊ, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

Rohit Pawar: “दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय”; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मंत्र्यांना खात्यांची जबाबदारी मिळावी
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “अजितदादांकडे ज्या महत्त्वाच्या खात्यांचा जबाबदारी होती, ती खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मंत्र्यांना मिळावीत, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. प्रशासकीय कामात अडथळा येऊ नये, यासाठी या रिक्त जागांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करावी लागणार आहे. शक्य झाल्यास आज रात्री किंवा उद्या सकाळी आम्ही पवार कुटुंबाशी संवाद साधू,”

अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नाही, याची कबुली देतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील रिक्त पदे आणि जबाबदाऱ्यांचे वाटप हा प्राधान्याचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या या चर्चेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...