Tuesday, December 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "अमित शाह,...

Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी…”

मुंबई । Mumbai

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला होता.मात्र हे सरकार ८० तासात कोसळले होते. या शपथविधीला आता पाच वर्ष उलटून गेले आहेत असे असताना अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवर मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

- Advertisement -

भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षात बोलणी करण्यासाठी शरद पवार, अमित शाह, गौतम अदानी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात ५ वर्षापूर्वी बैठक पार पडली होती, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अजित पवार मुलाखतीत बोलताना म्हणाले, भाजपसोबत जाण्यासाठी जवळपास पाच बैठका झाल्या. या बैठकांना गृहमंत्री अमित शहा, उद्योगपती गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह मी देखील हजर होतो. या बैठकीत भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा झाली होती. सर्वकाही ठरल्यानंतर नेतृत्वाने म्हणजेच शरद पवारांनी निर्णय बदलल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर आली, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

दरम्यान, अजित पवारांच्या या मुलाखतीवरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी टीका केली आहे. एका डिजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत एका ज्येष्ठ मंत्र्‍याने गौतम अदानी कशाप्रकारे महाराष्ट्रात भाजपाचं सरकार यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितले. त्यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. ते भाजपाचे अधिकृत मार्गदर्शक आहेत का, ज्यांच्यावर युती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती? महाराष्ट्रात कुठल्याही किंमतीत भाजपा सत्तेत यावी यासाठी इतक्या तत्परतेने त्यामागे काम का करत होते असा सवाल उपस्थित केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या