Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभेसाठी अजित पवार गटाची मोर्चेबांधणी; ८ ऑगस्टपासून 'जनसन्मान यात्रा'

विधानसभेसाठी अजित पवार गटाची मोर्चेबांधणी; ८ ऑगस्टपासून ‘जनसन्मान यात्रा’

नाशिकमधून होणार प्रारंभ

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) मोर्चेबांधणी सुरु केली असून त्यासाठी येत्या ८ ऑगस्टपासून राज्यात जनसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा प्रारंभ नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) दिंडोरीतून  होईल. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या आमदाराची राजकीय निवृत्ती जाहीर, वारसदारही ठरला!

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज पत्रकार परिषदेत जनसन्मान यात्रेची (Jansamman Yatra) माहिती दिली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही ‘जनसन्मान यात्रा’ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे. ‘जनसन्मान’ यात्रेत समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. ही यात्रा योजनांपुरती सिमीत न राहता समाज घटकांना काय अपेक्षित आहे. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्याही अजित पवार जाणून घेणार आहेत, असेही तटकरे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : मनसेचे विधानसभेसाठी दोन उमदेवार जाहीर, राज ठाकरेंची घोषणा

तसेच या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन सभा किंवा कार्यक्रम घेणार आहोत. महिला, युवक, शेतकरी, आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी अजित पवार संवाद करतील. या संवादात त्यांच्या मनातील भावना समजून घेत सरकारच्या यंत्रणांमार्फत अधिक प्रभावीपणे योजना पोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. संघटना म्हणून पूर्ण ताकदीने, क्षमतेने जनसन्मान यात्रेत सहभागी होणार आहे, असेही तटकरे म्हणाले.

हे देखील वाचा : बांगलादेशच्या पंतप्रधानांचा राजीनामा; शेख हसीना भारतात दाखल

उत्तर महाराष्ट्रानंतर (Uttar Maharashtra) येत्या १५ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रातून यात्रेची सुरूवात होईल. ती २२ ऑगस्टपर्यंत मुंबईत येईल. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी विदर्भातून यात्रेला सुरुवात होईल. पहिल्यांदा सलग पाच दिवसाचा दौरा आहे. ही यात्रा दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, सिन्नर, अहिल्यानगरमधील कोपरगाव, चांदवड, कळवण, धुळे शहर, अमळनेर, मालेगाव (मध्य) या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे.

हे देखील वाचा : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद

पहिल्या पाच दिवसानंतर सलग पाच दिवस पुणे जिल्ह्यातील (Pune District) वडगावशेरी, हडपसर, मावळ, पिंपरी, खेड आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर या विधानसभा मतदारसंघात तर त्यानंतर मुंबई उपनगरमधील बांद्रे पूर्व, कुर्ला, मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, ठाणे जिल्ह्यातील ऐरोली, मुंब्रा-कळवा, भिवंडी पूर्व, शहापूर या मतदारसंघात नंतर विदर्भातील नागपूर पश्चिम, काटोल, सावनेर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, ब्रम्हपुरी, गडचिरोली, अहेरी या मतदारसंघात ही यात्रा जाणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या