Monday, June 15, 2026
Homeक्राईमNashik Crime News : स्विफ्ट कारसह एमडी ड्रग्ज बाळगणारी टोळी जेरबंद; गुन्हे...

Nashik Crime News : स्विफ्ट कारसह एमडी ड्रग्ज बाळगणारी टोळी जेरबंद; गुन्हे शोध पथकाची कारवाई

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

शहरात अंमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेला पंचवटी पोलिसांच्या (Panchvati Police) गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. पंचवटी परिसरात कारमधून एम.डी. ड्रग्सची (मेफेड्रॉन) वाहतूक करणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी थरारक पाठलाग करून शिताफीने अटक (Arrested) केली. त्यांच्याकडून साडेबारा हजारांचे एम.डी. ड्रग्स, दोन रिकामे काडतूस आणि मारुती स्विफ्ट कार असा एकूण ३ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारची हालचाल संशयास्पद आढळली. पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने पाठलाग करून कारला शिताफीने घेरले आणि तिघांना ताब्यात घेतले.पोलिसांनी संशयितांची सखोल चौकशी केली असता त्यांची नावे अक्षय बाळू बोडके (२६, रा. सायखेडा गाव, खडकपुरा लेन, ता. निफाड), साहिल संतोष सोनवणे (२४, रा. बाप्पा सीताराम मार्ग, साई प्रीती रो-हाउस, आडगाव नाका, पंचवटी), नितीन रामनाथ गुंजाळ (३२, रा. कॉलेज रोड, गणपती मंदिरासमोर, सायखेडा, ता. निफाड) अशी असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांनाही अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार, सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश नेमाने, हवालदार कैलास शिंदे, अमोल काले, महेश नांदुर्डीकर, जयवंत लोणारे, युवराज गायकवाड, गणेश आगोणे, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, अमोल देशमुख, योगेश वायंकडे, विनोद चितळकर, नितीन पवार, अंकुश काळे, संतोष पाटील आणि कैलास वाघचौरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा (Case) पुढील तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाने करत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...