Thursday, June 18, 2026
Homeक्राईमNashik Crime News : घोटी पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धाड; दीड लाखांचे...

Nashik Crime News : घोटी पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धाड; दीड लाखांचे रसायन जागेवरच केले नष्ट

घोटी | Ghoti

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) खैरगाव शिवारात मोराच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवत असल्याची गुप्त माहिती घोटीचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती. ही माहिती समजताच पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस पथकासह या जंगलात पोलीस पथक त्या ठिकाणी पोहचले असता पोलिसांची चाहुल लागताच दारु बनवणाऱ्या इसमांनी जंगलात धुम ठोकली. पोलीसांनी या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी छापा टाकुन गावठी दारूसाठी लागणारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे गुळ व नवसागर रसायन मिस्त्रीत पाणीजागेवरच नष्ट केले.

- Advertisement -

खैरगाव (Khairgaon) येथील मोराच्या डोंगरात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू बनवली जाते. वन विभागाच्या हद्दीत मोठे जंगल असुन पोलिसांची चाहुल लागताच दारू बनवणारे इसम थेट जंगलात पळून जातात. दारू बनवणाऱ्या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत असुन या कारवाईत पहिल्या छाप्यात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे रसायन मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. तसेच ६ हजार पाचशे रुपये किमतीचे प्लॅस्टिकचे १३ ड्रम, १३ हजार रुपये किंमतीचे १३ लोखंडी ड्रम, २ हजार रुपये किंमतीचे लाकुड, ३ हजार पाचशे रुपये किमतीची सफेद ड्रममधील तयार गावठी दारू अशी १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा बिनापरवाना बेकायदेशीर  मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. 

दरम्यान, ही कारवाई गावठी दारू बनवणारा संशयित आरोपी वामन कोंडाजी आघाण, रा. खैरगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई (Action) पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण उदे, पोलीस हवालदार लक्ष्मण धकाते, परीक्षीत इंगळे, चव्हाण, सतिष चव्हाण, नितीन कटारे यांनी केली. कारवाई वेळी पोलीसांची चाहुल लागताच संशयित पळून गेले. सदर कारवाईमुळे गावठी दारू बनवणारे यांचे धाबे दणाणले आहे.

ताज्या बातम्या

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

0
दिंडोरी | प्रतिनिधी जानोरी येथे ३१ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश मच्छिंद्र सूर्यवंशी (३१, रा. मुखेड, ता. निफाड)...