Wednesday, September 9, 2026
HomeनगरAkole : अकोले तालुक्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा

Akole : अकोले तालुक्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा

गृह राज्यमंत्री योगेश कदम रॅलीत झाले सहभागी

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यात रविवारी (दि.9) आदिवासी दिनाचा जल्लोष ओसंडून वाहताना दिसून आला. राजकीय नेत्यांनी यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याची संधी साधली. शहरात निघालेल्या वेगवेगळ्या रॅलीमध्ये तालुक्यातून आलेले समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासीबहुल अकोले तालुक्यात मागील काही वर्षांपासून हा दिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. यावर्षीचा आदिवासी दिनही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देणारे विविध नेत्यांची छबी असणारे फलक शहरातील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. शहरातील मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

आदिवासी समाजाची ओळख सांगणारे झेंडे हाती घेत आदिवासी तरुण सकाळपासूनच शहरात दाखल होत होते. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा असणारे झेंडे मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. पारंपरिक आदिवासी वेशातील युवती, वैशिष्ठ्यपूर्ण टी शर्ट घातलेले तरुण, आदिवासी लोकगीतांच्या वाजत असणार्‍या ध्वनिफिती यामुळे वातावरणात वेगळाच उत्साह जाणवत होता. शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमास गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमोल खताळ व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर आमदार डॉ. किरण लहामटे मित्रपरिवाराच्यावतीने बाजारतळ येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. लहामटे यांनी आदिवासी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे तसेच गावातील शाळांकडे विशेष लक्ष देण्याचे तसेच जातीपातीचे राजकारण न करण्याचे आवाहन केले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान मोठे आहे. मात्र इतिहासात अशा सर्व क्रांतिकारकांनी नोंद सापडत नसल्याची खंत माजी आमदार वैभव पिचड यांनी राजूरमध्ये आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. आदिवासी विभागातील सर्व शाळांमध्ये आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देवगाव येथील आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकास अनेकांनी भेट देत त्यांना अभिवादन केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

…तर लगेच आवाज बंद करु शकतो
राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम अकोले येथे आदिवासी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते. बसस्थानक परिसरात त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु होता. त्यांचे भाषण सुरू झाल्यापासून शेजारून लोकप्रतिनिधी डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी दिनानिमित्त डीजेच्या आवाजात मिरवणूक सुरू होती. डीजेचा आवाज वाढल्यामुळे कदम यांनी मी राज्याचा गृह राज्यमंत्री आहे, मी जर ठरवले तर लगेच आवाज बंद करू शकतो. परंतु आज आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून मी पोलिसांना आदेश देत नाही. तसेच शिवसेनेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही असा इशारा त्यांनी आमदार लहामटे यांचे नाव न घेता दिला.

ताज्या बातम्या

चौकशीसाठी आलेल्या पथकासमोरच प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच...