Tuesday, July 23, 2024
Homeक्राईमधक्कादायक! पुण्यानंतर आणखी एक 'हिट अँड रन'चा थरार; थेट आठ जणांच्या अंगावर...

धक्कादायक! पुण्यानंतर आणखी एक ‘हिट अँड रन’चा थरार; थेट आठ जणांच्या अंगावर घातली कार

पुणे | Pune
पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रनचे प्रकरण ताजे असतानाच आता आळंदीमधील असाच हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातच आळंदीजवळ अल्पवयीन मुलाने महिलेसह काही लोकांच्या अंगावर कार घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक कार अंगावर घातल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार, वडगाव घेनंद इथल्या नाजुका रणजित थोरात यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वडगाव घेनंद इथल्या गणेश नगरमध्ये नाजुका थोरात राहतात. अल्पवयीन मुलासोबत त्यांचा आधीपासून वाद आहे. त्या वादाच्या रागातूनच अल्पवयीन मुलाने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.

अल्पवयीन मुलगा चारचाकी गाडीने थोरात यांच्या घराजवळ आला होता. त्याने गाडी रिव्हर्स घेत बरीच मागे नेली. त्यानंतर पुन्हा वेगाने येत रस्त्यावर असलेल्या लोकांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने लोक बाजूला गेल्याने कोणती जिवितहानी झाली नाही. मात्र नाजुका थोरात यांना किरकोळ दुखापत झालीय.

- Advertisment -

ताज्या बातम्या