Thursday, September 3, 2026
Homeमुख्य बातम्याMalegaon Bomb Blast Case : मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची...

Malegaon Bomb Blast Case : मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

मालेगाव शहरातील (Malegaon City) भिक्कू चौकात रमजान पर्वानिमित्त खरेदीसाठी गर्दी झाली असतांना २९ सप्टेंबर २००८ मध्ये दुचाकीव्दारे घडविलेल्या बॉम्बस्फोटात (Bomb Blast) ६ जण ठार तर शंभराहून अधिक महिला-नागरीक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी आज (गुरुवारी)विशेष एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर पार पडली.

यावेळी लोहोटी यांनी बॉम्बस्फोट प्रकरणातील (Bomb Blast Case) तपासावर काही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, “बॉम्बस्फोट झाला त्याठिकाणचा पंचनामा योग्य नाही. तसेच आरडीएक्स बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा कुठलाही पुरावा नाही. फक्त संशयाच्या आधारावर शिक्षा होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असेही न्यायाधीशांनी म्हटले. तसेच जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असे निरिक्षणही यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. 

न्यायाधीश लोहोटी पुढे म्हणाले की, “दुचाकीचा चेसी नंबर देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही. तसेच आरोपींना आधी लावलेला मोक्कानंतर मागे घेतल्याने याअंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले. तसेच बॉम्बस्फोटात जे जखमी झाले किंवा मृत्यू झाले ते बॉम्ब स्फोटामुळेच झाले आहेत हे सरकारी पक्ष सिद्ध करु शकला आहे”, असेही निरीक्षण न्यायाधीशींनी नोंदवले .

या आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी ऊर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित आयपीसीची कलम, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवाद‌विरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आला होता. मात्र आता त्यांची या प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे. तर श्याम साहू, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना फरार घोषित करण्यात आले होते.

२००८ मध्ये नेमकं काय घडलं होतं?

मालेगाव शहरातील भिक्कू चौकात रमजान पर्वानिमित्त खरेदीसाठी गर्दी झाली असतांना २९ सप्टेंबर २००८ मध्ये दुचाकीव्दारे घडविलेल्या बॉम्बस्फोटात ६ जण ठार तर शंभराहून अधिक महिला-नागरीक जखमी झाले होते. रात्री ९ वाजून ३५ मिनीटांच्या सुमारास दुचाकीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने परिसर हादरला होता. या स्फोटात परवीन शैख, मुस्ताक शंख, रफिक शेख, इरफान खान, अजहर सय्यद, हारून शहा या ६ लोकांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाने शहरात एकच खळबळ उडून पळापळ झाली होती. प्रारंभी स्फोट कशाचा झाला हे समजत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र स्फोटामुळे छिन्नविछीन्न झालेल्या दुचाकीमुळे हा बॉम्बस्फोट असल्याचे निदर्शनास आल्याने नागरीक संतप्त झाले होते.

या घटनेनंतर भिकू चौकात मोठा जमाव जमला होता, स्फोटातील जखमींना मनपासह शहरातील खाजगी रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने रात्रीतूनच सशस्त्र पोलीस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता.एकूण ३२३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येवून आरोपींना खटल्यासंदर्भात माहिती देण्यात येवून त्यांचे जबाब नोंदविले गेले होते. त्यानंतर आज या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल मुंबई येथे विशेष एनआयए न्यायालयात देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Belapur : चंपत राय यांच्या जागी बेलापूरचे भूमिपूत्र

0
बेलापूर |वार्ताहर| Belapur येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी यांची अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. काल अयोध्या येथे श्रीराम मंदिर...