Wednesday, January 15, 2025
HomeमनोरंजनAllu Arjun: पुष्पा-२ फेम अभिनेता अल्लू अर्जूनची न्यायालयीन कोठडी टळली; तासाभरात जामीन...

Allu Arjun: पुष्पा-२ फेम अभिनेता अल्लू अर्जूनची न्यायालयीन कोठडी टळली; तासाभरात जामीन मंजूर

मुंबई | Mumbai
मुंबई | Mumbai
सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक झाली आहे. पुष्पा 2 सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान चेंगराचेंगरी एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी अल्लू अर्जनुला ताब्यात घेण्यात आले होते. आता याविषयी नवी अपडेट समोर आली आहे. पुष्पा २ अभिनेता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अल्लू अर्जुनला सेशन कोर्टने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने आता त्याचा जामीन मंजूर केला आहे.

हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा २ चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलिस प्रशासनाना माहिती न देता उपस्थित लावली. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली. अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आले नाही. परिणामी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नामपल्ली कोर्टाने अल्लू अर्जुनला दोषी मानून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि लगेच त्याला जामीनही मंजूर झाला. त्यामुळे आता अल्लू अर्जून १४ दिवस कोठडीत जाणार नाही.

- Advertisement -

गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन अटक केली. त्यानंतर त्याला हैद्राबादच्या गांधी रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी हजर करण्यात आले. सुपरस्टार अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी तिथेही गर्दी झाली होती. अल्लू अर्जुनला पाहून त्यावेळीही चाहत्यांनी आरडाओरड सुरू केली.

तासाभरात जामीन मंजूर
अल्लू अर्जुनला हैद्राबाद चेंगराचेंगरी प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याने जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तासाभरातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या