Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभारत-यूएईमध्ये संरक्षण, ऊर्जा क्षेत्रात मोठे करार; 5 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा

भारत-यूएईमध्ये संरक्षण, ऊर्जा क्षेत्रात मोठे करार; 5 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा

दिल्ली | वृत्तसंस्था Delhi

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 20 मे दरम्यान यूएईसह नेदरलँड, स्वीडन आणि नॉर्वे दौऱ्यावर आहेत या पार्श्वभूमीवर भारत आणि यूएईदरम्यान संरक्षण, ऊर्जा सुरक्षा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्त्वाचे करार करण्यात आले आहेत.

यूएई दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या उपस्थितीत अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यूएईने भारतातील पायाभूत सुविधा आणि आर्थिक संस्थांमध्ये 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

दोन्ही देशांनी रणनीतिक संरक्षण भागीदारी मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. तसेच रणनीतिक पेट्रोलियम साठा आणि एलपीजी पुरवठ्यासंदर्भातही महत्त्वाचे करार करण्यात आले. यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा आधार मिळणार असल्याचे मानले जात आहे.

गुजरातमधील वाडिनार येथे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून सागरी पायाभूत सुविधा आणि औद्योगिक सहकार्याला चालना देण्याचा उद्देश आहे. यूएईने भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रासह आरबीएल बँक आणि सम्मान कॅपिटल्स मध्येही मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली.

बैठकीदरम्यान मोदी यांनी प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि कूटनीती हाच मार्ग असल्याचे सांगितले. पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी होर्मुज सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित राहणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

ताज्या बातम्या

Crime News : महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणारे दोघे पकडले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील सिध्दार्थनगर परिसरात एका महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. 11 जून रोजी मध्यरात्री पीडितेच्या घरासमोर काहीतरी पडल्याचा...