Wednesday, November 18, 2026
Homeक्राईमCrime News : चांदबिबी महालाजवळ युवक-युवतीला लुटले

Crime News : चांदबिबी महालाजवळ युवक-युवतीला लुटले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

चांदबिबी महालाजवळ बारदरी (ता. अहिल्यानगर) गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर युवकाला लोखंडी हातोड्याने मारहाण करून त्याच्या मैत्रिणीच्या हातातील चांदीची अंगठी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी (16 नोव्हेंबर) दोन अनोळखी इसमांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयन अब्दुल शेख (वय 23, रा. जैनब पार्क, अलमगीर, भिंगार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रविवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

आयन शेख हे आपल्या मैत्रिणीसह चांदबिबी महालाजवळील बारदरी गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर होते. यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या मैत्रिणीच्या हातातील अंदाजे दीड हजार रूपये किमतीची चांदीची अंगठी बळजबरीने हिसकावून घेतली. दरम्यान, या दोघांनी आयन शेख यांच्या पाठीवर आणि उजव्या डोळ्याखाली लोखंडी हातोड्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : टंचाईचे संकट; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला दोन महिने बंदी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे चारा साठा कमी होत असल्याने पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणारा...