Sunday, August 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार; सहा जखमी

रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार; सहा जखमी

घोटी। वार्ताहर Ghoti

धामणगाव शिवारात समृद्धी महामार्गांवर पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिकेचा अपघात होवून सहा जखमी तर एक ठार झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

संभाजी नगरकडून मुंबई येथे लहान बालकाला उपचारासाठी नेले जात असतांना धामणगाव परिसरात भरधाव वेगाने जाणारी रुग्णवाहिका ( क्र. एमएच, 12, आरएन-2265 ) चालकाचे नियंत्रण सुटून विरुद्ध बाजूच्या दूभाजकाला धडकली. त्यात रुग्ण वाहिकेने चार पाच पलट्या घेतल्याने रुग्णवाहिकेचा चक्काचूर झाला. यात संभाजी नगर येथील फेमिदबी रऊफ शेख ( चौधरी ) ( वय 55 ) रा. मुक्ताई नगर जि. जळगाव ह्या जागीच ठार झाल्या.

अपघातात अनेकांना मुक्का मार तर काहींच्या डोक्याला, हाताला, पायाला जखमा होवून रक्त स्त्राव झाला. यात गुलाम अब्दुल खान (वय 33 ) मुक्ताई नगर, रहिमान मोहम्मद शरीब खान (वय 47 ) रा. नांदूर जि. बुलढाना, सोयल जाफर खान (वय 28 ) रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी, रा. हरसूल जि. संभाजी नगर, अशोक पंडित पाटील (वय 45 ) रा. जालना रोड जि.संभाजी नगर, रुग्ण वाहिका चालक, भगवान संगीतकुमार इंगळे (वय 35 ) रा. संभाजी नगर, याच बरोबर उपचारासाठी नेले जाणारे पाच दिवशीय लहान बालक देखील जखमी झाले आहे.

याबाबत घोटी पोलीस ठाणे येथे 112 कॉल वरून मॅसेज पडताच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य पाहून उपस्थित पोलीस हवालदार सतिष शेलार, राजाराम डगळे,गुरुदेव मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीना एसएमबीटी रुग्णालय येथे उपचारासाठी सरकारी वाहनाने दाखल केले.

ताज्या बातम्या

राज-का-रण : कागदावरील स्मार्ट सादरीकरण अन् रस्त्यावर २५ फुट खड्डा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिंहस्थाच्या ध्वजारोहणासाठी आता अवघे दोन महिने उरलेले असताना कुंभमेळा आयुक्तांनी, काळजी नको, सगळं काही ठीक होईल,...