Tuesday, November 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याची मी आतुरतेने वाट पाहतोय"; राज...

“महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याची मी आतुरतेने वाट पाहतोय”; राज ठाकरेंचे विधान

मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील शहरांची बिघडलेली वाहतूक व्यवस्था, नियोजनशून्य विकास आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याची मी आतुरतेने वाट पाहतोय. खरंच वाट पाहतोय,” असे म्हणत त्यांनी राज्यातील व्यवस्था सुधारण्याची इच्छा व्यक्त केली. पनवेल येथे आयोजित मनसे वाहतूक सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वाहतुक कोंडी, पोलिसांवरील ताण, आणि नियोजनशून्य विकासकामांवरुन सरकार आणि प्रशासनाचे वाभाडे काढले. हे रॉकेटसायन्स नसून इच्छाशक्तीचा प्रश्न आहे असा टोलाही लगावला.

आज शहरांची आणि वाहतुकीची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. येत्या काळात ती आणखी अक्राळविक्राळ रूप धारण करेल. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज असून महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतो, याची मी वाट पाहत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून तो पुढे आक्राळविक्राळ होणार आहे
मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, “मी आता काही वाहतूकदारांशी बोललो. माझा संबंध फक्त वाहतुकीशी येतो. मी माझ्या भाषणात अनेकदा शहरांचा, वाहतुकींचा विषय काढला आहे. आता त्यांनी ई-चलानचा मुद्दा काढला. ई-चलानला विरोध नाही. पण, ज्या प्रकारे लावले जातात, त्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. ई-चलान कॅमेऱ्यावर यायला हवे. पण, व्यक्तीशः जातात आणि ई-चलान फाडतात. आज हा वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जो मी अनेकदा भाषणात बोलून दाखवला आहे, तो पुढे आक्राळविक्राळ होणार आहे, आता झालेलाच आहे. परंतु, कोणत्याही गोष्टींची बंधनं, चौकट ही आपल्याकडे घातलेली नाही.”

शिंदे-फडणवीसांविरोधात मोठा गेम प्लॅन, दिल्लीतून…; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

दुचाकीस्वारांना तर वाटते की सिग्नल आपल्यासाठी बनलेलाच नाही. आधी दुपारी १ वाजता गाड्या थांबायच्या, आता थांबत नाहीत. मला पायलट गाडीची सुरक्षा आहे, पण मी त्यांना सायरनचा आवाज न करायला सांगतो. कारण तो आवाज ऐकून मलाच वाटते की पोलीस मलाच पकडून नेणार आहेत. मी माझ्या चालकाला सुरक्षेचा ताफा असूनही सिग्नल न तोडण्याची सक्त ताकीद दिली आहे, कारण मला पाहून इतर लोकांनी नियम तोडू नयेत, असे राज ठाकरेंनी सांगितले.

आपल्याला माहितीच नाही गाड्या चालवायच्या कशा आणि पार्क कशा करायच्या
“या देशातील ट्रॅफिक पाहिल्यावर देशाचे वर्तमान आणि भविष्यही दिसते. याचे कारण आपल्याला माहितीच नाही की गाड्या चालवायच्या कशा आणि पार्क कशा करायच्या? हे सरकारलाही माहिती नाही. त्यामुळे आकार उकार नावाची गोष्टच राहिलेली नाही. आपल्याकडे पूल बांधले जातात. रस्ते अशासाठी बांधले जातात जेणेकरून दोन वर्षांनी कामी निघावीत. याबाबत गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही.” असे म्हणत राज ठाकरेंनी टीकादेखील केली.

हा कायदा आहे, हा नियम आहे, कोण पाळतं? कोणी नाही पाळत
अनेकवेळा आपण बघतो की द्रुतगती मार्गाने जात असताना कुठेही जात असताना अनेकदा लॉऱ्या, टेम्पो, ट्रेलर्स सगळ्या उजव्या बाजूने चालली असतात रस्त्याच्या. खरे तर त्यांनी पूर्णपणे डाव्या बाजूने चालले पाहिजे. हा कायदा आहे, हा नियम आहे, कोण पाळतं? कोणी नाही पाळत. रस्त्याच्या कॉर्नरला गाड्या पार्क करू नयेत, हा कायदा आहे, कोण पाळतं? कोणीही पाळत नाही.” असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊसदरावर निर्णय न झाल्यास शनिवारी रेलरोको-रास्तारोको

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत...