Tuesday, April 28, 2026
HomeनगरAMC : शहर लेखा व्यवस्थापक रणदिवे बडतर्फ

AMC : शहर लेखा व्यवस्थापक रणदिवे बडतर्फ

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या संचालकांचा आदेश || आरोग्य खात्यातील अपहार प्रकरण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात 15 व्या वित्त आयोगाच्या रकमेत झालेल्या अपहारप्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे याला निलंबित करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यालयाकडून शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवेची नियुक्ती रद्द करून त्याला बडतर्फ केले आहे. अभियानाच्या सहाय्यक संचालक डॉ. दिप्ती देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत.

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या चौकशीत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 15 लाख रुपये शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवे याच्या वैयक्तिक खात्यात वर्ग केले. ते पुन्हा प्रत्येकी पाच लाख रुपयांप्रमाणे निधी खात्यात वर्ग केले. तसेच त्यानंतर 16 लाख 50 हजार रणदिवे याच्या खात्यात वर्ग केले. ते अद्याप खात्यात जमा केलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी डॉ.बोरगे व रणदिवे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. 48 तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी पोलीस कोठडीत असल्याने आयुक्त डांगे यांनी डॉ. बोरगे याला निलंबित केले. तसेच, रणदिवेबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाकडे अहवाल दिला होता.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत एखाद्या कंत्राटी कर्मचार्‍याविरूध्द फसवणुकीचा किंवा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास, तसेच दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने किमान 48 तास तुरुंगात राहिल्यास अशा कर्मचार्‍याची नियुक्ती संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी तत्काळ संपुष्टात आणावी, अशी तरतूद आहे. त्यानुसार अपहार प्रकरणी दोषी आढळून आल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला व 48 तासांपेक्षा जास्त पोलीस कोठडी दिली असल्याने 12 फेब्रुवारी पासून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत महानगरपालिकेत शहर लेखा व्यवस्थापक या पदावरील रणदिवे याची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच...