Sunday, July 26, 2026
HomeनगरAMC Election : दोन दिवसांत 50 प्रचार कार्यक्रमांना परवानगी; निवडणूक प्रचाराला वेग

AMC Election : दोन दिवसांत 50 प्रचार कार्यक्रमांना परवानगी; निवडणूक प्रचाराला वेग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचाराला जोरदार सुरूवात झाली असून, पहिल्याच दोन दिवसांत विविध राजकीय पक्षांनी सभा, पदयात्रा, चौक सभा आणि कोपरा सभांचा धडाका सुरू केला आहे. महापालिकेत आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षामार्फत प्रचारासाठी आवश्यक परवानग्या दिल्या जात आहेत. आचारसंहिता कक्षाकडून आतापर्यंत शहरातील विविध भागांत होणार्‍या प्रचार पदयात्रा, चौक सभा व कोपरा सभांसाठी एकूण 50 परवानग्या देण्यात आल्या आहेत. तसेच, शहरात लावण्यात येणार्‍या 35 मोठ्या होर्डिंगनाही परवानगी देण्यात आल्याची माहिती परवानगी कक्षाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

शनिवारी विविध पक्षांच्या प्रचार सभांसाठी 25 परवानग्या देण्यात आल्या होत्या, तर रविवारी पदयात्रा, चौक सभा आणि कोपरा सभांसाठी सुमारे 24 परवानग्या देण्यात आल्या. एक खिडकी परवानगी कक्षामार्फत अर्ज स्वीकारल्यानंतर प्रथम ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले जाते. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडून सुरक्षा परवानगी घेतली जाते. या सर्व प्रक्रियेनंतर अंतिम परवानगी आचारसंहिता कक्षाकडून दिली जाते. गेल्या दोन दिवसांत एकूण 50 प्रचार कार्यक्रमांना परवानगी देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, महापालिकेच्या सार्वजनिक जागेत सभा घेण्यासाठी किंवा प्रचार कार्यालय उभारण्यासाठी अद्याप कोणत्याही उमेदवार अथवा पक्षाकडून परवानगी मागण्यात आलेली नाही. बहुतांश उमेदवारांनी आपली प्रचार कार्यालये खासगी जागांमध्ये उभारली आहेत. महापालिकेच्या जागेत मंडप, प्रचार कार्यालय किंवा मंडळ उभारण्यास कोणालाही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे आचारसंहिता कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आचारसंहिता भंगाच्या दोन तक्रारी
आचारसंहिता भंगाबाबत आतापर्यंत दोन तक्रारी आचारसंहिता कक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. मात्र, कक्षातील पथकाने या दोन्ही तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी व शहानिशा केल्यानंतर त्या तक्रारी फेटाळून लावण्यात आल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...