Friday, November 27, 2026
HomeनगरOnion Rate : कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकर्‍यांची चिंता वाढली

Onion Rate : कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकर्‍यांची चिंता वाढली

ऐन दुष्काळात पाकिस्तानच्या कांद्याचा मोठा फटका

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर जिल्ह्यासह लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या नऊ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 1 हजार 749 रुपयांची घसरण झाली आहे. यंदा आधीच दुष्काळ आहे, त्यामध्ये आता कांद्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा स्वस्त मिळत असल्याने कांद्याचे दर कमी होत आहेत. यंदा आधीच दुष्काळ आहे, त्यामध्ये आता कांद्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याने त्याचा मोठा फटका हा शेतकर्‍यांना बसत आहे. कांद्याचे दर आता थेट प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे.

- Advertisement -

देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा अधिक होत आहे, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा स्वस्त मिळत असल्याने कांद्याचे दर घसरले आहेत. बाजारभावातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली असून, कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सकस आहाराचा संदेश आता शाळाशाळांत पोहोचणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नागरिकांमध्ये अन्न सुरक्षा, सकस व संतुलित आहार, सुरक्षित अन्न सेवन आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राज्यभरात ‘योग्य...