Friday, November 27, 2026
Homeक्राईमCrime News : सेवानिवृत्त व्यक्तीला 9.95 लाखांचा ऑनलाईन गंडा

Crime News : सेवानिवृत्त व्यक्तीला 9.95 लाखांचा ऑनलाईन गंडा

व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट एपीके फाइल पाठवून फसविले || सायबर पोलिसांत गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बँकेचे लाइफ सर्टिफिकेट अपडेट करण्याच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेली बनावट एपीके फाइल मोबाईलमध्ये पाठवून एका सेवानिवृत्त व्यक्तीची 9 लाख 95 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी (25 नोव्हेंबर) अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या कॉलनी, आदर्शनगर, नगर-कल्याण रोड येथे राहणार्‍या 59 वर्षीय व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादीच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने महाराष्ट्र बँक लाइफ सर्टिफिकेट या नावाची एपीके फाइल पाठविली. बँकेच्या लाइफ सर्टिफिकेटशी संबंधित फाइल असल्याचे भासवून ही फाइल पाठविण्यात आली होती. या फाइलच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी फिर्यादीच्या मोबाईलचा बेकायदेशीरपणे अ‍ॅक्सेस मिळविला. त्यानंतर त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रातील बचत खात्यातून वेळोवेळी रक्कम कपात करण्यात आली. अशा प्रकारे त्यांच्या खात्यातून एकूण 9 लाख 95 हजार रूपये काढून घेत फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपवरून बनावट फाइल पाठविणार्‍या अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले तपास करीत आहेत.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी ?
बँकेच्या नावाने आलेली अनोळखी एपीके फाइल डाउनलोड करू नये, व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या संशयास्पद लिंक किंवा फाइल उघडू नयेत, मोबाईलमध्ये अनोळखी अ‍ॅप इन्स्टॉल करू नये, बँक खात्याचे तपशील, ओटीपी व पासवर्ड कोणालाही देऊ नयेत, फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सकस आहाराचा संदेश आता शाळाशाळांत पोहोचणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नागरिकांमध्ये अन्न सुरक्षा, सकस व संतुलित आहार, सुरक्षित अन्न सेवन आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राज्यभरात ‘योग्य...