Tuesday, October 13, 2026
HomeनगरAMC : भाडेकरू असलेल्या मालमत्तांवर दुप्पट कराचा बोजा!

AMC : भाडेकरू असलेल्या मालमत्तांवर दुप्पट कराचा बोजा!

क्षेत्रफळानुसार करयोग्य मूल्याच्या थेट दुप्पट दराने आकारणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील भाडेकरू असलेल्या मालमत्ताधारकांना आता क्षेत्रफळानुसार निश्चित होणार्‍या करयोग्य मूल्याच्या थेट दुप्पट दराने मालमत्ता कर भरावा लागणार आहे. मालमत्ता सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकनानंतर निर्माण झालेल्या कर आकारणीच्या वादावर प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार महासभेने भाडेकरू असलेल्या मालमत्तांसाठी दुप्पट दराने कर आकारणी करण्याचा ठराव मंजूर केला आहे.

- Advertisement -

महापालिकेने केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणानंतर वाढीव क्षेत्रफळ असलेल्या तसेच भाडेकरू असलेल्या मालमत्ताधारकांना करयोग्य मूल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. करयोग्य मूल्य आणि प्रत्यक्ष आकारला जाणारा मालमत्ता कर यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विशेषतः भाडेकरू असलेल्या मालमत्ताधारकांच्या बाबतीत वार्षिक भाड्याच्या आधारे करयोग्य मूल्य निश्चित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. या कर आकारणीच्या पध्दतीला नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता.

दरम्यान, खासगी कंपनीकडून करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षण आणि पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सभागृहात करण्यात आला. या विषयावरून सभागृहात प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. आयुक्तांसमवेत झालेल्या चर्चेदरम्यान प्रस्तावाच्या फाईली त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आल्याने हा विषय चांगलाच चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नगरसेवकांची बैठक घेऊन कर आकारणीच्या वादावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रशासन आणि काही नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत भाडेकरू असलेल्या मालमत्ताधारकांना क्षेत्रफळानुसार येणार्‍या करयोग्य मूल्याच्या दुप्पट दराने कर आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सिल्व्हर ओकमध्ये खलबतं

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट...