Thursday, July 9, 2026
Homeमुख्य बातम्याUS-Iran Conflict : अमेरिकेने घेतला पाक विरोधात मोठा निर्णय; दिला मोठा दणका

US-Iran Conflict : अमेरिकेने घेतला पाक विरोधात मोठा निर्णय; दिला मोठा दणका

न्युयॉर्क | New York

इराण , इस्त्रायल आणि अमेरिकेतील संघर्ष (Iran Israel and America Conflict) वाढताना दिसत आहे. इराणच्या मोठ्या शहरांमध्ये अमेरिकेकडून घातक हल्ले केली जात आहेत. तेहरानमध्ये (Tehran) सर्वात जास्त नुकसान करण्यात आले.

- Advertisement -

इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेच्या लष्कर तळांवर मोठे हल्ले (Attack) केले जात आहेत. इस्त्रायलकडून आपल्या नागरिकांना बंकरमध्ये लपण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. इराणने (Iran) एक व्हिडीओ शेअर करत आपली लष्करी ताकद दाखवली आहे, त्याने मोठी खळबळ उडाली.

इराणने इतका मोठा शस्त्र साठा (Arms Stock) नक्की कुठे लपवला याचे टेन्शन जगाला आले. पायाखालची जमिन सरकावी इतका मोठा शस्त्र साठा इराणकडे आहे. यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई (Ali Khamenei) यांना अमेरिकेने हल्ल्यात ठार केले. गेल्या एका महिन्यापासून आयातुल्ला अली खामेनेई यांचे प्रत्येक क्षणाचे लोकेशन अमेरिकेकडे होते आणि ते काय करत आहेत, याची प्रत्येक हालचाल अमेरिकेकडे होती.

आयातुल्ला अली खामेनेई (Ali Khamenei) यांना अमेरिकेने ठार केल्यानंतर अनेक देशात लोक थेट रस्त्यावर उतरली. पाकिस्तानमध्ये (Pakistan) आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर मोठा हिंसाचार बघायला मिळाला. हेच नाही तर कराची इस्लामाबाद आणि अनेक मोठ्या शहरांमध्ये अमेरिकन दूतावास कार्यालयाला लोकांनी टार्गेट केले. तोडफोड आणि जाळपोळ अमेरिकन दूतावास कार्यालयाची करण्यात आली. यानंतर पोलिसांनी 10 गोळीबार केला, ज्या गोळीबारात 10 जण ठार झाले. मात्र, असे असतानाही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये अमेरिकन दूतावालाला टार्गेट करण्यात आला.

यादरम्यानच आता अमेरिकेने एक अतिशय मोठा आणि पाकिस्तानसाठी धक्कादायक निर्णय घेतला. अमेरिकेकडून पाकिस्तानात (Pakistan) अमेरिकेची व्हिसा सर्व्हिस (Visa Service) बंद करण्यात आली. आता पाकिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळणार नाही. पूर्ण व्हिसा सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरण 65 टक्के भरले; निळवंडेत ‘एवढा’ पाणीसाठा

0
अतिवृष्टीमुळे भातरोपे, बांधांचे प्रचंड नुकसान, पंचनाम्याची मागणी भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव केल्याने धरणात वेगाने नवीन...