Tuesday, December 3, 2024
HomeनाशिकNashik News : नाशकात मुसळधार, हायवेवर पाणी; अमित शाहांचा ताफा कडेकडेने कार्यक्रमस्थळी...

Nashik News : नाशकात मुसळधार, हायवेवर पाणी; अमित शाहांचा ताफा कडेकडेने कार्यक्रमस्थळी मार्गस्थ

नाशिक | Nashik

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Tour) असून त्यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची विभागनिहाय आढावा बैठक होत आहेत. आज ते नाशिकमध्ये (Nashik) असून त्यांच्या उपस्थितीत येथील हॉटेल डेमोक्रॉसी येथे उत्तर महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होत आहे.मात्र, या आढावा बैठकीच्या ठिकाणी जातांना शाह यांच्या ताफ्याला नाशकात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याच्या कडेने जावे लागल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हे देखील वाचा :   Sanjay Raut : “अमित शाह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेताय याचा अर्थ…”; संजय राऊतांचे टीकास्त्र

नाशकात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु असतानाच अमित शाह यांचा ताफा नाशकात दाखल झाला.यावेळी उड्डाणपुलाखाली मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर (Road) पाणी साचले असल्याने शाह यांच्या ताफ्याला मार्ग बदलावा लागला. त्यानंतर शाहांचा ताफ्याला पाण्यातून मार्ग काढून रस्त्याच्या कडेकडेने कार्यक्रमस्थळी मार्गस्थ व्हावे लागले.

हे देखील वाचा :  Uddhav Thackeray : “बाजारबुणगे महाराष्ट्रात येऊन…”; उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

दरम्यान, सध्या अमित शाहांच्या उपस्थितीत हॉटेल डेमोक्रॉसी येथे उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सुरु आहे. या बैठकीत त्यांनी नेत्यांनीही बूथवर जाऊन काम करावे, कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, असे आवाहन शाह यांनी केले आहे. तसेच पक्षातील गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या