Sunday, March 30, 2025
HomeमनोरंजनAmitabh Bachchan Tweet : “ए ट्विटर भाऊ! तुम्ही ऐकत आहात का?...”, बिग...

Amitabh Bachchan Tweet : “ए ट्विटर भाऊ! तुम्ही ऐकत आहात का?…”, बिग बींच्या ट्विटची चर्चा

मुंबई | Mumbai

अनेक दिग्गजांचे ब्लू टिक (Blue Tick) आज सकाळपासून ट्विटरने (Twitter) काढून टाकले होते. या बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश होता. तर ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या देखील ट्विटर अकाउंटवरील ब्लू टिक ट्विटरने हटविले होते. या सगळ्याची आज सकाळपासूनच चर्चा होती.

- Advertisement -

आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Tweet Trending) यांनी त्यांचं ब्लु टिक परत मिळवण्यासाठी एलन मस्क समोर हात जोडले आहेत. अमिताभ यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून सांगितलं आहे की.. ए ट्विटर भाऊ! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्ही पैसेही भरले आहेत… तर ते ब्लु टिक आहे ते परत द्या कि आम्हाला, जेणेकरून लोकांना कळेल की आम्हीच आहोत – अमिताभ बच्चन.. हात जोडून आम्ही विनंती करत आहोत. आता काय तुझ्या पाय पडू का?अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे की, मी पैसे भरले आहेत. आता तरी मला ब्लू टिक द्या. जेणेकरून लोकांना कळेल मीच अमिताभ बच्चन आहे. तुमच्या पुढे मी आधीच हात जोडले आहेत. आता पाय पण पडू का?.

यंदाची ‘मन की बात’ राहाणार विशेष.. काय आहे कारण? वाचा सविस्तर

ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी घोषणा केली होती की 20 एप्रिलपासून, सर्व लेगेसी वेरिफाईड अकॉउंटवरून ब्लू टिक काढून टाकले जाईल. त्याचबरोबर त्यांना या सुविधे हव्या असल्यास त्यांना पैसे मोजावे लागतील. यामुळे आज म्हणजेच 21 एप्रिलला सकाळी अनेकांच्या अकाउंटवरून ब्लू टिक हटवण्यात आले आहे.

भाईजानच्या एन्ट्रीला शिट्ट्या, ‘किसी का भाई किसीकी जान’ कसा वाटला? बॉक्सऑफिसवर किती कमावणार?

दरम्यान, शाहरुख खान, सलमान खान, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, आलिया भट्ट, बिपाशा बसू, अर्जुन रामपाल, अनुष्का शर्मा, फराह खानसह अनेक राजकीय आणि क्रिडा विश्वातील दिग्गजांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर मंदिरात बुंदी लाडू प्रसाद विक्री केंद्र सुरू

0
त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये देखील आलेल्या भाविकांना आता अल्पदरात बुंदीच्या लाडूचा प्रसाद मिळणार आहे. विश्वस्त स्वप्नील शेलार आणि...