Thursday, March 13, 2025
HomeराजकीयAmol Kolhe : अजितदादांच्या जाहीरनाम्यात ‘प्रिंटिंग मिस्टेक’, जनतेला चंद्र आणून देण्याचा वादा…;...

Amol Kolhe : अजितदादांच्या जाहीरनाम्यात ‘प्रिंटिंग मिस्टेक’, जनतेला चंद्र आणून देण्याचा वादा…; अमोल कोल्हेंचा खोचक टोला

पुणे । प्रतिनिधि

अजित पवारांच्या जाहीरनाम्यात ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाली आहे. अजित दादांकडून जनतेला चंद्र आणून देण्याचा वादा तेवढा राहून गेला, असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

राज्यावर तब्बल साडे आठ लाख कोटींचं कर्ज आहे, त्यानंतर ही जाहीरनाम्यातून इतकं सारं करण्याचं आश्वासन दिलं जातं आहे. लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून विधानसभेवेळी बहीण झाली लाडकी, असं म्हणत २१०० रुपये देण्याच्या आश्वासनांवर प्रश्न उपस्थित करत आजच्या जाहीरनाम्यातून अजित दादांनी पोकळ वादा केल्याची टीकाही अमोल कोल्हेंनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा जाहीरनामा बारामती येथे प्रसिद्ध केला. त्यावर अमोल कोल्हे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवारांच्या जाहीरनाम्यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, मला वाटतं त्यात एक प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. त्यामध्ये एक ओळ छापायची राहून गेली आहे. आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ. कारण तब्बल साडेआठ लाख कोटींचं कर्ज राज्यावर आहे. असं असताना जाहीरपणे असंवैधानिक पद्धतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यानंतर इतक्या गोष्टी जर पूर्ण करायच्या राहून गेल्या असतील तर मुळात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं केलं कशासाठी? या पद्धतीने पक्ष फोडून चिन्ह पळवून पक्षाचा नाव पळून जे काही मिळवलं जे काही करण्याचा प्रयत्न केला गेला त्यातून काय साध्य झालं? म्हणजे लाडके बहीण योजना याबाबत ठोस माहिती आहे की, लोकसभेमध्ये झाली मतांची कडकी म्हणून बहीण झाली यांची लाडकी आणि या पद्धतीने लाडके बहीण योजना जाहीर करत असताना त्याचं बजेट आहे का इथून सुरुवात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी जी पेन्शन योजना या योजनेला कोणताही विरोध नाही मात्र वस्तुस्थिती काय आहे, त्याकडे पाहणे गरजेचे आहे.

मागच्या दोन अडीच महिन्यांमध्ये आपण पाहिलं अनेक योजनांचा निधी हा ठराविक योजनांकडे वळवण्यात आला आणि इतर सर्व योजना वाऱ्यावरती सोडण्यात आल्या. त्यानंतर काही जीवनावश्यक वस्तू यांचे भाव स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले ते इतकं हास्यस्पद आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री एकाही जीएसटी परिषदेला उपस्थित राहिलेले नाहीत. सातत्याने ते गैरहजर आहेत आणि जो जीएसटी लादला जातो आणि सर्वसामान्य यांच्या खिशातून पैसा काढला जातो आहे. यामध्ये अर्थमंत्री जीएसटी कौन्सिमध्ये आवाज त्यांनी उठवला नाही. त्यामुळे ते कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहेत असा सवाल यावेळी अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

माझी महायुतीच्या सर्व नेत्यांना एक कळकळीची विनंती आहे किंवा आवाहन आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये दहा जीवनावश्यक वस्तूंची भाव स्थिर ठेवले का याची एकदा यादी द्यावी. आत्ताच दिवाळी झाली दिवाळीचा किराणा भरत असताना आमच्या सर्व माता भगिनींना सर्वसामान्य नागरिकांच्या समोर ही गोष्ट आहे. सामान भरत असताना खिशाला नेमका किती खार लागलाय, हे प्रत्येकाला कळलेले आहे आणि त्यामुळे महायुतीचं आश्वासन हे केवळ पोकळ हवा आहे. आता सत्तेत येणार नाही हे माहित आहे त्यामुळे वाटेल त्या आश्वासन द्या हे सांगणं हे या जाहीरनाम्यातून स्पष्ट दिसत आहे, असा टोला माहिती सरकारला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...