Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानपरिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन शिलेदार ठरले; 'यांना' मिळाली उमेदवारी

विधानपरिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन शिलेदार ठरले; ‘यांना’ मिळाली उमेदवारी

मुंबई | Mumbai

देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असतानाच जुलै २०२४ मध्ये रिक्त होत असलेल्या महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. याआधी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) १० जून ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

- Advertisement -

मात्र, शिक्षक संघटनांकडून सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने १० जून रोजी राज्यातील बहुतांश सर्वच शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली आहे. त्यानंतर आता नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी १ जुलै २०२४ रोजी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने (Thackeray ShivSena) उमेदवारांच्या नावांची घोषणा करत निवडणुकीत आघाडी घेतली आहे.

शिवसेनेने अनिल परब (Anil Parab) यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून तर शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर (J.Mo. Abhyankar) यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) मध्यवर्ती कार्यालयाकडून या दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा करणारे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. अनिल परब हे सध्या विधानपरिषदेचे आमदार असून उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते परिवहन मंत्री होते. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.

दरम्यान, अनिल परब हे २०१२ आणि २०१८ असे सलग दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा ठाकरेंकडून संधी देण्यात आली आहे. अनिल परब यांच्या आमदारकीचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर ज.मो. अभ्यंकर हे शिवसेनेशी सलग्न असलेल्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष असून अनेक वर्षांपासून ते शैक्षणिक क्षैत्रात सक्रीय आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या