Friday, May 3, 2024
HomeUncategorizedनंदुरबार : जिल्ह्यात पुन्हा एक करोना पॉझिटीव्ह

नंदुरबार : जिल्ह्यात पुन्हा एक करोना पॉझिटीव्ह

नंदुरबार – 

नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील 31 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 19 झाली आहे. यात शहादा येथील 9, नंदुरबार येथील 6 तर अक्कलकुवा येथील 4 रुग्णाचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात 612 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे, त्यात 524 अहवाल निगेटिव्ह आले असून 69 अहवाल प्रलंबित आहेत.

नंदुरबार तालुक्यातील येथील एका 31 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या तरुणाची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री अद्याप समजू शकलेली नाही. या रुग्णाच्या घरातील सदस्य व संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या रुग्णामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 झाली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 612 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 524 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 69 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. 19 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या