Sunday, July 5, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 210 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 449 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 रुपये ते 210 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 41 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाची 7 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2420 रुपये, जास्तीत जास्त 2500 रुपये. सरासरी 2450 रुपये भाव भाव मिळाला. हरभरा (Gram) 3 क्विंटलची आवक झाली. हरभर्‍याला (Gram) 5380 ते 5535 रुपये तर सरासरी 5460 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 255 रुपये...