Thursday, August 20, 2026
HomeनगरAhilyanagar : तरूणांनी व्यसनापासून दूर राहून आपले भविष्य घडवावे

Ahilyanagar : तरूणांनी व्यसनापासून दूर राहून आपले भविष्य घडवावे

अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीला चालना दिली जात आहे. तरूणांनी व्यसनापासून दूर राहून आपले भविष्य घडवावे, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने राबविलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाचे कौतुकही त्यांनी केले.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. ‘एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य’ व्यसनमुक्ती जिल्ह्याच्या दिशेने एक सामूहिक पाऊल या संकल्पनेवर आधारित या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शहरात व्यसनमुक्त रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी आमदार विक्रम पाचपुते, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, अंमली पदार्थांचे सेवन केवळ व्यक्तीचे आरोग्य बिघडवत नाही, तर त्याच्या कुटुंबावर, समाजावर आणि देशाच्या प्रगतीवरही विपरीत परिणाम करते. व्यसनामुळे मानसिक ताण, आर्थिक नुकसान, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सामाजिक विघटनाला चालना मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक तरूणाने व्यसनापासून दूर रहावे. यावेळी आ. पाचपुते, आ. दाते यांनी देखील मनोगत व्यक्त केले. अधीक्षक सुदर्शन यांनी प्रास्ताविक केले.

व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनी पुढे यावे : शिंदे
अंमली पदार्थ आणि व्यसनांच्या वाढत्या विळख्यामुळे अनेक तरूणांचे शिक्षण, करिअर, आरोग्य आणि कुटुंबीयांचे सुख धोक्यात येत आहे. आजचा तरूण हा देशाच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार आहे. तरूणांनी कोणत्याही परिस्थितीत व्यसनाच्या आहारी जाऊ नये, तसेच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यापासून परावृत्त करून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले.

4 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी
पोलीस मुख्यालयातून निघालेल्या रॅलीत सुमारे 4 हजारांपेक्षा अधिक शालेय, महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. व्यसनमुक्तीच्या विविध घोषणा या वेळी देण्यात आल्या. पोलीस मुख्यालय, नीलक्रांती चौक, दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, चितळे रोड, रूचिरा मार्गे सीताराम सारडा विद्यालय व पुन्हा नीलक्रांती चौकातून पोलीस मुख्यालय असा रॅलीचा मार्ग होता. ही रॅली एवढी लांब होती की तिचे शेवटचे व पहिले टोक नीलक्रांती चौकात एकमेकांना भिडले होते. रॅलीच्या संयोजनासाठी ट्रेकॅम्प परिवाराने महत्त्वाची भूमिका बजावली.

ताज्या बातम्या

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावेत – पालकमंत्री गिरीश...

0
नाशिक, दि. १९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणारी विविध विकास...