Tuesday, September 15, 2026
Homeक्राईमCrime News : आर्मी मेजर असल्याची बतावणी; नेवाशाच्या तरूणाला लुबाडले

Crime News : आर्मी मेजर असल्याची बतावणी; नेवाशाच्या तरूणाला लुबाडले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मी आर्मी मेजर आहे, जम्मूला जाण्यासाठी तिकीट काढायचे आहे. मला रेल्वे स्टेशनवर सोडता का? अशी बतावणी करून एका अनोळखी इसमाने तरूणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोबाईल दुरूस्तीचे कारण सांगून वाडिया पार्क येथे थांबवले. घरच्यांना फोन करण्याच्या बहाण्याने तरूणाचा मोबाईल घेतल्यानंतर दुचाकीची चावीही हातोहात घेतली. तरूणाला दुचाकीवर बसू न देताच संशयिताने दुचाकी आणि मोबाईल घेऊन पोबारा केला.
ही घटना शनिवारी (12 सप्टेंबर) दुपारी शहरातील वाडिया पार्क परिसरात घडली.

- Advertisement -

याप्रकरणी नीलेश रघुनाना जाधव (वय 27, रा. निंभारी, ता. नेवासा) यांनी रविवारी सायंकाळी (13 सप्टेंबर) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी निलेश शनिवारी अहिल्यानगर शहरात आले होते. त्यांना माळीवाडा येथील एका हॉटेलच्या काउंटरसमोर एक अनोळखी इसम भेटला. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते. मी आर्मी मेजर आहे. मला जम्मूला जाण्याचे तिकीट बुक करायचे आहे. तुम्ही तुमच्या गाडीवरून मला अहिल्यानगर रेल्वे स्टेशनला सोडाल का? अशी बतावणी त्याने केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जाधव यांनी त्याला स्वतःच्या दुचाकीवरून रेल्वे स्टेशनवर नेले.

दरम्यान, तिकीट बुक झाल्यानंतर दोघे वाडिया पार्क येथे आले. संशयित इसमाने त्याचा मोबाईल नादुरूस्त असल्याचे सांगून घरच्यांशी संपर्क साधण्यासाठी जाधव यांचा मोबाईल मागितला. जाधव यांनी विश्वासाने त्यांचा मोबाईल त्याच्याकडे दिला. त्यानंतर संशयिताने मला लवकर पुणे बसस्थानकात जायचे आहे. मी गाडी चालवतो, तुम्ही मागे बसा,असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जाधव यांनी दुचाकीची चावी त्याच्याकडे दिली. मात्र, दुचाकी सुरू करून संशयित इसमाने जाधव यांना मागे बसण्याची संधीही न देता दुचाकी घेऊन तेथून पलायन केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यासह राज्यभरात बाप्पांचे जल्लोषात आगमन

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात काल लाडक्या गणरायाचे अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात आगमन झाले. दिवसभर शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात बाप्पा मोरयाचा जयघोष दुमदुमला होता....