Thursday, October 22, 2026
Homeक्राईमCrime News : सैन्यभरती फसवणूक प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे

Crime News : सैन्यभरती फसवणूक प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे

बनावट नियुक्तीपत्रे आणि निवडीचे ई-मेल पाठविल्याचा प्रकार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सैन्यदलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरूणांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण गंभीर बनले असून, या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या तरूणांची संख्या तसेच फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोघा तरूणांची 23 लाख 39 हजार 378 रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

तरूणांकडून लाखो रूपये उकळल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तीपत्रे आणि निवडीचे ई-मेल पाठविण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी ऋषिकेश महादेव गोल्हार (वय 25, रा. भाळवणी, ता. पारनेर) यांनी 17 ऑक्टोबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी गणेश कारभारी थोपटे (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा संशयित अक्षय उत्तम हरणे (रा. नांदेड) याचा शोध सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याने पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गोल्हार यांना सैन्यदलात नोकरी करण्याची इच्छा असल्याने ते भरतीसाठी सराव करीत होते.

याचदरम्यान त्यांचा मित्र सौरव जन्हाड याने गणेश थोपटे हा पुणे येथे एअर फोर्समध्ये नोकरीला असून, तो सैन्यदलात नोकरी मिळवून देऊ शकतो, असे गोल्हार यांना सांगितले. त्यानंतर गोल्हार यांनी थोपटे याच्याशी संपर्क साधला. आमिषातून गोल्हार यांच्याकडून 13 लाख 29 हजार 378 रूपये त्यांचा मित्र अंकेश अशोक दावभट (वय 24, रा. पाडळी कान्हूर, ता. पारनेर) यालाही आसाम रायफल्समध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आठ लाख 10 हजार रूपयांना गंडा घातला.

अनेक तरूणांची फसवणूक ?
अशाच प्रकारे आणखी काही तरूणांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील फसवणूक झालेल्या व्यक्तींची संख्या आणि आर्थिक नुकसानीचा आकडा वाढू शकतो. याच पार्श्वभूमीवर अधीक्षक सुदर्शन यांनी गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी पुढील तपासासाठी गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संशयितांची भूमिका आणि आणखी कोणी या फसवणुकीला बळी पडले आहे का, आणखी आरोपी आहेत का, याचा तपास केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विखे, थोरात, गडाख आणि घुलेंची बंद दाराआड चर्चा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. यात मंगळवारी सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री...